google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 दादर- सातारा एक्सप्रेसचे सांगोल्यात अशोक कामटे संघटनेच्यावतीने जल्लोषात स्वागत. सांगोलकरांची मुंबईला जाण्याकरता थेट सोय होणार :-अशोक कामटे संघटना

Breaking News

दादर- सातारा एक्सप्रेसचे सांगोल्यात अशोक कामटे संघटनेच्यावतीने जल्लोषात स्वागत. सांगोलकरांची मुंबईला जाण्याकरता थेट सोय होणार :-अशोक कामटे संघटना

 दादर- सातारा एक्सप्रेसचे सांगोल्यात अशोक कामटे संघटनेच्यावतीने जल्लोषात स्वागत.


सांगोलकरांची मुंबईला जाण्याकरता थेट सोय होणार :-अशोक कामटे संघटना

सांगोला (प्रतिनिधी) (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

मिरज- कुर्डूवाडी रेल्वे मार्ग ब्रॉडगेज झाल्यापासून अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने सांगोल्यातून किंवा मिरजवरून थेट मुंबईकरिता रेल्वे गाडी सुरू करावी याकरिता रेल्वे मंत्रालय ,रेल्वे विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

2017 या वर्षांपासून मागणी असलेल्या बहुप्रतीक्षेत रेल्वे क्रमांक ११०२७ व ११०२८ दादर -सातारा- दादर या रेल्वेचे शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने जल्लोषात स्टेशनवर स्वागत करण्यात आले.

सदरील  दादर -सातारा रेल्वे सांगोला रेल्वे स्थानकावर येताच गाडीचे चालक ,गार्ड ,इरशाद शेख सर ,रेल्वे गुप्त शाखा विभाग अधिकारी सोलापूर 

,सांगोला स्टेशन अधीक्षक सत्येंद्रसिंह यांचा  यथोचित सन्मान करून गाडीस शेकापचे युवा नेते डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. सदरील रेल्वे आठवड्यातून सोमवार, बुधवार,

 शनिवार तीन दिवस सकाळी 08 वाजून 40 मिनिटांनी सातारा कडे प्रयाण करणार आहे ,संध्याकाळी 08 वाजून 13 मिनिटांनी दादरकडे जाण्यासाठी सांगोला स्टेशन मधून धावणार आहे .सदरील स्वागत समारंभास 

सांगोला शहरवासीय, रेल्वे प्रवासी संघटना, प्रवासी वर्ग ,ज्येष्ठ नागरिक, सर्वपक्षीय नेते , व्यापारी , प्रतिष्ठित नागरिक ,अशोक कामटे संघटनेचे सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 मुंबई गाडी सुरू झालेली प्रवासी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे त्याचबरोबर प्रवाशांचा प्रवास सुखदायक व अल्पखर्चात होणार आहे.

दादर -सातारा - दादर ही रेल्वे दैनंदिन सुरू व्हावी याकरिता या पुढील काळात अशोक कामटे संघटना प्रयत्न करणार असल्याचे संघटनेचे नीलकंठ शिंदे सर यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments