google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज ! निवडणूक आयोगाकडून मोठी चूक

Breaking News

ब्रेकिंग न्यूज ! निवडणूक आयोगाकडून मोठी चूक

 ब्रेकिंग न्यूज ! निवडणूक आयोगाकडून मोठी चूक


केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काल लोकसभा आणि चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.

 त्यानुसार देशात सात टप्प्यांत मतदान होणार असून पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी होणार आहे. 

तर चार जून रोजी मतमोजणी होईल. अरूणाचल प्रदेश, सिक्कीम, ओडिशा आणि आंध्र प्रदेश या राज्यांत विधानसभा निवडणुकाही लोकसभेसोबतच असतील. 

पण या तारखा जाहीर करताना आयोगाकडून मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे. आयोगाने अरूणाचल प्रदेश आणि सिक्कीम या राज्यांतील विधानसभा निवडणूक 19 एप्रिल रोजी घेतली जाणार आहे. 

तर काल जाहीर केल्याप्रमाणे मतमोजणी चार जून रोजी घेतली जाणार होती. पण दोन्ही राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाळ दोन जून रोजीच संपणार आहे. 

तर आयोगाच्या वेळापत्रकानुसार मतमोजणी त्यानंतर दोन दिवसांनी होती. ही चूक आयोगाकडून आज सुधाण्यात आलेली आहे. त्यानुसार आयोगाने या राज्यांतील मतमोजणीच्या तारखांमध्ये बदल केला आहे. 

आता या दोन राज्यांतील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी चार जून ऐवजी दोन जून रोजी होणार असल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. निवडणुकीची संपूर्ण प्रक्रियाही याचदिवशी पूर्ण केली जाणार असल्याचे आयोगाकडून म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments