ब्रेकिंग न्यूज...निलंबित सहायक पोलिस निरीक्षक सूरज विष्णू चंदनशिवे
खुनाच्या गुन्ह्यातील निलंबित पोलिस सुनील केदार याचा कोठडीत मृत्यू
सांगोला : वारणा लुटीतील संशयित आरोपी निलंबित सहायक पोलिस निरीक्षक सूरज विष्णू चंदनशिवे (वय ४३) याच्या खूनप्रकरणी संशयित आरोपी निलंबित पोलिस कॉन्स्टेबल सुनील मधुकर केदार (वय ४१, रा.वासूद, ता. सांगोला, जि. सोलापूर)
कळंबा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. त्याचा गुरुवारी (दि. १४) दुपारी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय म्हणजेच सीपीआरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.
निमोनिया आणि मधुमेहाच्या त्रासामुळे त्याच्यावर उपचार सुरू होते. याबाबत अधिक माहिती अशी की, निलंबित पोलिस कॉन्स्टेबलसुनील केदार आणि निलंबित सहायक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे या दोघात आर्थिक कारणावरून वाद होता.
त्याच वादातून सुनील केदार याने साथीदारांच्या मदतीने ऑगस्ट २०२३ मध्ये वासूद येथे चंदनशिवे याचा खून केला होता.
त्या गुन्ह्यात सांगोला पोलिसांनी अटक केलेला सुनील केदार आणि त्याचा साथीदार विजय केदार या दोघांची न्यायालयीनकोठडीत रवानगी झाली होती. हे दोघे २९ ऑगस्ट २०२३ पासून कळंबा कारागृहात होते.
मधुमेह आणि निमोनियाचा त्रास वाढल्याने सुनील याच्यावर गेल्या आठवड्यापासून सीपीआरमध्ये उपचार सुरू होते.
उपचारादरम्यान गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली.
0 Comments