आदर्श शिक्षण संस्थेच्यावतीने मुख्याध्यापिका प्रतिभा लिगाडे यांचा सत्कार संपन्न.
सांगोला (प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
कडलास हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी प्रतिभा बजरंग लिगाडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ सांगोलाच्यावतीने प्रशालेत सत्कार करण्यात आला.
वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात संस्थाध्यक्षा श्रीमती कौशल्यादेवी शिंदे मॅडम यांनी नूतन मुख्याध्यापिका प्रतिभा लिगाडे यांचा शाल ,श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी सचिव निळकंठ शिंदे सर ,सहसचिव विठ्ठलपंत शिंदे सर, प्रशालेचे मुख्याध्यापक रमेश पवार सर ,सहशिक्षिका सुवर्णा इंगवले मॅडम यांनीही अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या .
सदर सत्काराबद्दल मुख्याध्यापिका प्रतिभा लिगाडे मॅडम यांनी संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आभार मानले .यावेळी विद्यार्थी, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .
0 Comments