google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाचा अजितदादा गटाला दणका

Breaking News

मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाचा अजितदादा गटाला दणका

मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाचा अजितदादा गटाला दणका


केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे अजितदादा पवार यांना देण्याचा निर्णय जाहीर केला. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली.

 शरद पवार गटाकडून दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली. अजितदादा हे आमच्या लोकप्रियतेचा वापर करत असल्याचा दावा करत

 फोटो आणि घड्याळ चिन्ह वापरण्यावर शरद पवार गटाने आक्षेप नोंदवला. यावर शरद पवार यांचे नाव आणि फोटो वापरु नका, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

 दरम्यान आजच्या सुनावणीत शरद पवार गटाकडून वकिल अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तीवाद केला. यामध्ये त्यांनी अजितदादा शरद पवारांचा फोटो आणि घड्याळ कसं वापरतात? ही फसवणूक आहे. 

आमच्या लोकप्रियतेचा वापर का केला जातो आहे? असा सवाल उपस्थित केला. तसेच ग्रामीण भागात लोक म्हणत आहेत की, घड्याळाला मत द्या. अजितदादा गटाचे पोस्टर्स पाहा, त्यावर शरद पवारांचा फोटो आहे. 

असे म्हणत सिंघवी यांनी अजितदादा गटाचे पोस्टर्सही न्यायालयात दाखवले. दरम्यान, यावर शरद पवार यांचे नाव आणि चिन्ह वापरणार नाही असे लेखी द्या, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने अजितदादा गटाला दिले आहेत.

Post a Comment

0 Comments