खळबळजनक घटना....कृषी पर्यवेक्षकाचा कार्यालयातच खून , कर्मचारी वर्गात खळबळ
जिल्हयातील आखाडा बाळापूर येथील कृषी बीज गुणन केंद्रात कार्यरत एका कृषी पर्यवेक्षकावर चाकूने हल्ला करत त्याचा खून करण्यात आला आहे.
या घटनेने परिसरात खळबळ माजली असून कर्मचारी वर्गात दहशत माजली आहे.राजेश कोल्हाळ असे मृत कर्मचाऱ्यांचे नाव आहे.
कृषी पर्यवेक्षक राजेश कोल्हाळ हे त्यांच्या कार्यालयात काम करत हाेते. अचानक त्यांच्यावर चाकू हल्ला झाला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. मारेक-याने त्यांच्यावर चाकून वार केल्याने त्यांचा भरपूर रक्तस्त्राव झाला. घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे कार्यालय परिसरात माेठा गाेंधळ निर्माण झाला. शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्याचा चाकूने भोसकून खून झाल्याची माहिती काही नागरिकांनी पाेलिसांना दिली. या घटनेचा तपास पाेलिस करीत आहेत.
0 Comments