सांगोल्यातील सुरू असलेल्या कामाचा दर्जा निकृष्ट पाच तासाहून अधिक वेळ चालली
सांगोल्याची आमसभा.... नागरिकांनी पाडला समस्यांचा पाऊस....
शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त
सांगोला :- पंचायत राज समितीच्या शिफारशीनुसार सांगोला पंचायत समितीची सन 2023- 2024 ची आमसभा गुरुवार दिनांक 14 मार्च रोजी सकाळी 11 वाजता
मा. आमदार अॅड. श्री. शहाजीबापू पाटील यांचे अध्यक्षतेखाली पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह (टाऊन हॉल), सांगोला येथे संपन्न झाली.
यावेळी व्यासपीठावर आ. शहाजीबापू पाटील, मा.आ.दिपकआबा साळुंखे-पाटील, डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह तालुक्यातील सर्व शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सांगोला गावात व वाड्या-वस्त्यांवर प्रस्ताव आल्यानंतर दोन दिवसात टैंकर उपलब्ध करून दिला जाईल. आजपासून या आमसभेत वाळू बंदी ठराव पास झाल्याने तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी
वाळू उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. तालुक्यातील सर्वत्र सुरू असलेल्या विविध योजनांतील कामात अधिकारी व ठेकेदार यांच्यात वाटाघाटी होऊन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला
जात असल्याचा आरोप नागरिकांनी करून ही कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचा पाढा आमसभेत वाचला. तर आ. शहाजीबापू पाटील व माजी आ. दीपक साळुंखे-पाटील यांनी विकास कामांसाठी
निधी कमी पडू देणार नाही. अधिकाऱ्यांनी ठेकेदारांकडून चांगल्या दर्जाची कामे करून घ्यावीत, अशा सूचना करून कोणत्याही अधिकाऱ्यास पाठीशी घालणार नसल्याचे सांगितले.
सांगोला येवील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहात गुरुवार, १४ मार्च रोजी आमसभा पार पडली. यावेळी उपस्थित नागरिकांनी तालुक्यातील विविध प्रश्नांचा भडिमार केला व सभा वादळी ठरली.
आमसभेमध्ये मागील आमसभेमधील प्रश्न प्रलंबीत असताना मग आजची आमसभा कशाला, तालुक्यात जलजीवन योजनेची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असताना
पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. बँच 5 ची पाण्याची असलेली दुरावस्था, पैसे टाकून पाणी पिल्यावर पाण्याचा प्रश्न कसा मिटणार,
तालुक्यातील सुरु असलेला अवैध वाळू उपसा, वाळू उपसा करताना पिकातून वाहने गेल्यामुळे झालेल्या नुकसान, लोकप्रतिनिधींच्या नावाचा गैरवापर, एसटी कोलमडलेले वेळापत्रक,
सर्वसामान्य लोकांना वाळू वाल्यांकडून दिला जाणारा त्रास.. सांगोला येथील टाऊनहॉल नूतनीकरणींचा विषय.., टाऊन हॉलचे टेंडर मोठे परंतु काम निकृष्ठ, टाऊन हॉलमधील यापुर्वीच्या खुर्थ्यांचे काय झाले..
मर्यादेपेक्षा अधिक कालावधीत लागणारे डिजीटल बोर्ड, यासह वीज विषयक तकारी फलबाग भनटान चोऱ्या जनावरे तक्रारी, फळबाग अनुदान, चोऱ्या, जनावरे चोरी, टेंभू म्हैसाळ, निरा उजवा कालवा फाट आदी प्रश्नांवर नागरिकांनी प्रशासनास धारेवर धरले.
आमसभेत लागला विद्यार्थीनीचा प्रश्न मार्गी... गावास मिळणार 20 लाखाचे बस स्टॅण्ड
कमलापूर येथील एका विद्यार्थीनीने एस.टी थांबत नाही आणि एस टी बसस्थानक नाही याबाबत प्रश्न मांडला होता. या मागणीची दखल घेऊन आ. शहाजीबापू पाटील यांनी त्वरीत 20 लाखाचे बस स्टॅण्ड देवू अशी घोषणा केली
व एस.टी. डेपोतील अधिकाऱ्यांने लगेचच बस थांबली जाईल अशी घोषणा केली. या विद्यार्थीनीने आमसभेत येऊन सर्वच विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लावला त्याबद्दल तिचे यावेळी अभिनंदन होत होते.
या सभेस आ. शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, डॉ. बाबासाहेब देशमुख, तहसीलदार संतोष कणसे, पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे,
गटविकास अधिकारी आनंद लोकरे, मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी, रफिक नदाफ, सूरज बनसोडे, विविध गावचे सरपंच, अधिकारी, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, महिला, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून जलजीवन योजनेतून सुमारे ८० कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. या सर्व पाणीपुरवठ्याची कामे ठेकेदाराकडून निकृष्ट सुरू असल्याच्या नागरिकांनी तक्रारी केल्या.
त्यास उपस्थित अभियंता कमळे यांनी दिलेल्या माहितीवरून नागरिकांचे समाधान झाले नाही.
त्यामुळे आ. शहाजीबापू व माजी आ. दीपकआबांनी उपस्थित सर्व शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली व कामात पारदर्शकता व सुधारणा करण्याच्या सूचना केल्या.
तहसीलदार, सार्वजनिक पाणीपुरवठा, बांधकाम विभाग, भूमी अभिलेख विभाग, वीज वितरण, नगरपरिषद सह इतर विभागातील अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभाराविषयी नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
चौकट
दोन वर्षांपूर्वी झालेल्या आमसभेतील प्रश्नांची सोडवणूक नाही आमसमेत काय ती निकृष्ट कामं काय ते कॉन्ट्रॅक्टर काय ते अधिकारी सगळं कसं ओके मधी न्हाय बापू असा सूर नागरिकांनी आळवत्त्याने कोण काय बोलतंय हेच समजत नव्हतं.
उपस्थित नागरिकांनी गेल्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या आमसभेतील उपस्थित केलेल्या प्रश्नांची सोडवणूक अद्याप झाली नसत्त्याचे निदर्शनास आणून दिले.
तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांची अडवणूक करून मूळ प्रश्नाला अधिकारी बगल देतात.
सांगोला तालुक्यात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या विविध ठिकाणच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून ही कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत.
तालुक्यात आज जे काही घडत आहे ते विद्यमान आ. शहाजीवापू पाटील यांच्यामुळेच घडत असल्याचा आरोप आरपीआयचे नेते माजी नगरसेवक सूरज बनसोडे यांनी केला.
वाळू माफियांवर करणार कठोर कारवाई
तहसीलदार संतोष कणसे यांनी तालुक्यात दररोज राजरोसपणे वाळू उपसा सुरू असल्याची जाहीर कबुली देत इथून पुढे सर्वच नदीकाठी अवैध वाळू उपसा होणार नाही
अशी हमी देऊन वाळू माफियांवर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले, तर तहसीलदार हे सर्वसामान्य नागरिकांची दखलच घेत नसत्त्याचे नागरिकांतून जाहीर सांगितले गेले.
0 Comments