google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महाराष्ट्रातील काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर; सोलापुरातून शिंदे, पुण्यात रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी

Breaking News

महाराष्ट्रातील काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर; सोलापुरातून शिंदे, पुण्यात रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी

 महाराष्ट्रातील काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर; सोलापुरातून शिंदे, पुण्यात रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी


काँग्रेसची राज्यातील पहिली यादी जाहीर; कोल्हापुरातून शाहू महाराज, पुण्यातून रविंद्र धंगेकर रिंगणात

महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.

या यादीत सोलापूरातून प्रणिती शिंदे, पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

तर नांदेडमधून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोल्हापूरहून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

नंदुरबार - गोवाळ पाडवी

अमरावती - बळवंत बसवंत वानखेडे

नांदेड - वसंतराव बळवंतराव चव्हाण

पुणे - रविंद्र हेमराज धंगेकर

लातूर - डॉ. शिवाजीराव काळगे

सोलापूर - प्रणिती शिंदे

कोल्हापूर - शाहू शहाजी छत्रपती

लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रत्येक पक्षाने प्रचारात उडी घेतली आहे. मात्र, काही ठिकाणी मराठा समाजाने आरक्षणाच्या प्रश्नावरुन राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे अनेक नेत्यांना याचा फटका बसत असून आल्या पावली माघारी फिरावे लागत आहे. 

यावर आता काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे  यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून नेत्यांना गावबंदी करण्यापेक्षा भाजपच्या नेत्यांना घरबंदी करणे गरजेचे आहे.

 भाजपने आरक्षणाच्या प्रश्नावरून खेळी केली आहे. त्यामुळे त्यांना उघडं पाडण्यासाठी येत्या निवडणुकीत घरबंदी करणे गरजेचे आहे, अशी भूमिका काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी मांडली.

सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रणिती शिंदे हे पंढरपूर तालुक्यातील गावभेटी दौऱ्यात होते. यावेळी तालुक्यातील कौठाळी येथे मराठा तरुणांनी घोषणाबाजी करत

 त्यांच्या गाठीभेटीत गोंधळ घातला. त्यानंतर आमदार प्रणिती शिंदे यांनी गावबंदी नको तर भाजपच्या नेत्यांना घरबंदी करा, असे विधान केले.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून महाराष्ट्रामधील पहिली यादी जाहीर करण्यात आली असून सहा जागांवरती उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. 

अपेक्षेप्रमाणे कोल्हापूर लोकसभेला श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.पुण्यामधून आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

 काँग्रेसकडून नंदुरबार अमरावती नांदेड पुणे लातूर सोलापूर आणि कोल्हापूर या जागांवरील उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. नंदुरबारमधून गोवळ पडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

 अमरावतीमधून बळवंत वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नांदेडमधून वसंतराव बळवंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर लातूरमधून शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

 तर सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ अशी लढत होणार आहे.

Post a Comment

0 Comments