google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खा.रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ महायुतीतील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची आज बैठक

Breaking News

खा.रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ महायुतीतील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची आज बैठक



खा.रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ महायुतीतील  पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची आज बैठक


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी): 43 माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीतील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, रयत क्रांती संघटना, आरपीआय (आठवले गट) या महायुतीचे अधिकृत उमेदवार

 खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सांगोला विधानसभा मतदारसंघातील महायुतीमध्ये समाविष्ट घटक पक्षांचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आज गुरुवार २८ मार्च रोजी सकाळी १० वाजता सांगोला

 मिरज रोडवरील हर्षदा लॉन्स या ठिकाणी आयोजित केली आहे. तरी या बैठकीला महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. 

          माढा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आज गुरुवार २८ मार्च रोजी सकाळी १० वाजता सांगोल्यात

 मिरज रोडवरील हर्षदा लॉन्स या ठिकाणी महायुतीमध्ये समाविष्ट घटक पक्षांचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे.  

या बैठकीला महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

 सकाळी दहा ते दुपारी ३ वाजेपर्यंत पंचायत समिती गण नुसार बैठक होणार आहे. कोळा, जुनोनी, सोनंद, घेरडी, वाढेगाव, जवळा, उदनवाडी, नाझरे, कडलास अजनाळे, वाकी शिवणे, एखतपूर, 

महूद, चिकमहूद या पंचायत समिती गणातील महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केलेली आहे. तरी या बैठकीस महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे

 असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत,  युवासेना संपर्कप्रमुख सागर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील, शिवसेना तालुकाध्यक्ष दादासाहेब लवटे,

 राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मधुकर बनसोडे, भाजप तालुकाध्यक्ष अतुल पवार, भाजपा तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर, रासपचे जिल्हाध्यक्ष सोमा मोटे, रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष भारत चव्हाण, आरपीआयचे तालुकाध्यक्ष खंडू सातपुते यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments