google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोल्यात महूद व हातीद अशा दोन नवीन पोलिस ठाण्यांची निर्मिती होणार - आमदार शहाजीबापू पाटील

Breaking News

सांगोल्यात महूद व हातीद अशा दोन नवीन पोलिस ठाण्यांची निर्मिती होणार - आमदार शहाजीबापू पाटील

सांगोल्यात महूद व हातीद अशा दोन नवीन पोलिस ठाण्यांची निर्मिती होणार - आमदार शहाजीबापू पाटील



शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२

सांगोला (प्रतिनिधी): तालुक्यातील वाढती लोकसंख्या व वाढती गुन्हेगारी लक्षात घेता सांगोला तालुक्यात एकच पोलीस स्टेशन असल्याने कायदा

 व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच पोलिसांच्या कामकाजावरचा ताण कमी करण्याच्या उद्देशाने सांगोला पोलीस स्टेशन अंतर्गत महूद व हातीद येथे

 नवीन दोन पोलीस स्टेशनचे प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आले आहेत. लवकरच या दोन्ही पोलीस ठाण्याला मंजुरी मिळणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.

          सांगोला तालुक्यातील वाढती लोकसंख्या व वाढती गुन्हेगारी लक्षात घेता सांगोला तालुक्यात एकच पोलीस स्टेशन असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी

 गेल्या वीस वर्षांपासून तालुक्यात नवीन दोन पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्याची वारंवार मागणी केली जात होती. मात्र, या मागणीकडे गेल्या वीस वर्षांत दुर्लक्ष झाल्याने नवीन पोलीस ठाण्यांचा  धूळखात पडला होता.

 २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर आमदार शहाजीबापू पाटील यांनी या दोन नवीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीसाठी वारंवार पाठपुरावा केला आहे. 

         सांगोला शहर आणि तालुक्याचे वाढते परिक्षेत्र आणि त्या तुलनेत असलेल्या एकमेव पोलीस ठाणे असल्याने सांगोला तालुक्यात आणखी नव्या पोलीस ठाण्याची गरज आहे. तालुक्यातील वाढती 

लोकसंख्या व वाढती गुन्हेगारी लक्षात घेऊन पोलिसांच्या कामकाजावरचा ताण कमी करण्याच्या उद्देशाने आमदार शहाजीबापू पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून सांगोला पोलीस स्टेशन अंतर्गत 

महूद व हातीद येथे नवीन दोन पोलीस स्टेशनचे प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आले आहेत. पोलीस ठाण्यांवर असलेला कार्यभार कमी करणे व पोलिसांचे कामकाज अधिक प्रभावी करणे

 या उद्देशाने दोन नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दोन नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात येणार आहे.

 सांगोला पोलीस ठाण्याचे विभाजन करून महूद व हातीद या दोन नव्या पोलीस ठाण्याचा आकृतीबंध शासनाकडे पाठविला आहे.

 लवकरच या दोन नवीन पोलीस ठाण्यांच्या प्रस्तावाला मान्यता मिळणार असल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments