ब्रेकिंग न्यूज..सांगोला पोलीसची वाळू माफियांवर कारवाईचा धडाका गणेश कुलकर्णी यांचे वाळू माफ यावर गनिमी कावे सुरू
सांगोला /(प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला पोलिसांकडून सांगोला तालुक्यात बेकायदेशीर रित्या वाळू उपसा करणाऱ्या वरती करावयाचा धडका सुरू आहे.
सलग दुसऱ्या दिवशीही वाळूमाफिया वरती सांगोला पोलीस स्टेशनकडून कारवाई करण्यात आली आहे. यामुळे वाळू माफी यांचे कंबरड मोडले आहे.
याबाबत पुढील प्रमाणे माहिती,पोना/262 शेख नेम. स्थानिक गुन्हे शाखा सोलापुर ग्रामीण व
सांगोला पोलीस ठाणेकडील सपोनि जगताप लो।, पोहेका / 1547 वजाळे, पोकों/178 पांढरे, पोकों/1811 कुलकर्णी, असे संयुक्तपणे अवैद्य धंद्यावर कारवाई करणेकामी
सांगोला पोलीस ठाणे हद्दीत खाजगी वाहनाने पेट्रोलींग करीत असताना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, कोपटेवस्ती येथील माण नदी पात्रातुन सांगोला शहराकडे एक टिपर अवैध वाळू भरून जात आहे.
अशी माहीती मिळाली, त्यावरुन मा. पोलीस निरीक्षक सो यांना संपर्क करुन बातमीबाबत माहिती दिली, त्यांनी तात्काळ कारवाई करणेबाबत सुचना दिल्याने कारवाई
करणेकामी जुना दहीवड़ी रोड येथुन कोपटेवस्तीकडे जात असताना मणेरी वस्ती सांगोला येथे एक पांढरे रंगाचा टिपर येत असल्याचे दिसले. त्याचा संशय आल्याने टिपर चालकास त्यात हाताचे इशाराने
टिपर थांबविणेबाबत इशारा केल्यावर त्याने त्याचे ताब्यातील टिपर रस्त्याचे कडेला थांबवून टिपरमधुन खाली उतरून अंधाराचा फायदा घेवुन झाडी झुडपात पळून गेला.
पथकाने त्याचा शोध घेतला परंतु ती मिळुन आला नाही. त्यानंतर पकडलेल्या टिपरची पाहणी केली असता त्याचे पाठीमागील हौद्यामध्ये वाळू भरली
असल्याचे दिसुन आले. पकडलेल्या टिपरचे वर्णन खालील प्रमाणे- 8 लाख रु कि.चा एक पांढरे रंगाचा टाटा कंपणीचा टिपर
त्याचा आरटीओ नं- एम. एच. 10 झेड 4963 असा असलेला आ.जु.वा.कि.अं. 15 हजार रु किमतीची अंदाजे तिन ब्रास वाळु कि.अं. 15 हजार रुपये येणे प्रमाणे वरील वर्णनाचा व किंमतीचा वाळुने भरलेला
एक पांढरे रंगाचा टाटा कंपणीचा टिपर निकुन आल्याने व त्यावरील चालक पळून गेल्याने सदरचा टिपर पुढील कारवाई करीता पोकों/ कुलकर्णी यांनी चालवत पोलीस ठाणेस आणलेला आहे.
22 मार्च रोजी एक पांढरे रंगाचा टाटा कंपणीचा टिपर त्याचा आरटीओ नं- एम. एथय. 10 Z 4963 यावरील अज्ञात चालक याने त्याचे
ताब्यातील वरील टिपर मध्ये अंदाजे तिन ब्रास गाडु बेकायदेशीर रित्या शासनाची रॉयलटी न भरता स्वतःचे फायद्याकरिता चोरुन वाहतुक करीत असताना मिळून आला आहे.
म्हणून माझी अज्ञात टिपर चालका व मालक विरुध्द भादवि कलम 379, संह पर्यावरण संरक्षण कायदा कलम 9,15 प्रमाणे कायदेशीर फिर्याद सांगोला पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली आहे पुढील तपास सांगोला पोलीस करत आहे.
0 Comments