google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज : धैर्यशील मोहिते पाटील यांच्या गाडीवर मराठा आरक्षणावरून ग्रामस्थांनी गाजर फेकून केला निषेध….

Breaking News

ब्रेकिंग न्यूज : धैर्यशील मोहिते पाटील यांच्या गाडीवर मराठा आरक्षणावरून ग्रामस्थांनी गाजर फेकून केला निषेध….

 ब्रेकिंग न्यूज : धैर्यशील मोहिते पाटील यांच्या गाडीवर मराठा आरक्षणावरून ग्रामस्थांनी गाजर फेकून केला निषेध….





 

सांगोला तालुक्यातील वाडेगाव गावातील मराठा बांधवांच्या गावबंदी रोषाला सामोरे जावून धैर्यशील मोहिते पाटील यांना कार्यकर्त्याशी संवाद न साधताच गावातून काढता पाय घ्यावा लागला..

वाढेगाव सांगोला तालुक्यातील वाढेगाव गाव भेटी दौऱ्यावर आलेल्या धैर्यशील मोहिते-पाटील यांना सकल मराठा समाजाच्या रोषाला चांगलेच सामोरे जावे लागले.

 यावेळी सकल मराठा समाज बांधवांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना पुढार्यांना गाव बंदी असताना तुम्ही गावात कसे आला, असा संताप व्यक्त करत त्यांच्या समोर टोमॅटो आणि गाजरे टाकून ‘एक मराठा लाख मराठा..’ च्या घोषणा देऊन त्यांना गावातून हुसकावून लावले. 

यावेळी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी व सकल मराठा समाज बांधव यांच्यात काही वेळ शाब्दिक वाद झाल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी तेथून काढता पाय घेतला. 

या घटनेमुळे गावात काही काळ गोंधळ उडाला होता.

वाढेगाव येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देऊन सर्वपक्षीय राजकीय पुढार्‍यांना गाव बंदी केली आहे.

 वाढेगावातून लोकसभा निवडणुकीसाठी माढा मतदारसंघातून मराठा बांधवांचे चार अर्ज दाखल करण्याचा ठरावही केला आहे. दरम्यान धैर्यशील मोहिते पाटील यांनी काल बुधवारी सांगोला तालुक्यातील विविध गावांना भेटी देवून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 

रात्री ९ च्या सुमारास ते वाढेगावात आल्यानंतर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस व शेकापक्षाने संयुक्तपणे आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी हा प्रकार घडला. यावेळी सकल मराठा समाज बांधवांनी गावात सर्वपक्षीय नेतेमंडळींना गावबंदी असताना 

तुम्ही धैर्यशील मोहिते पाटील यांना गावात आणलेच कसे, म्हणून गावपुढा-यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी काही काळ सकल मराठा समाज बांधव व मोहिते पाटील समर्थक कार्यकर्त्यात शाब्दिक वाद ही झाला. 

अखेर धैर्यशील मोहिते पाटील यांना कार्यकर्त्याशी संवाद न साधताच गावांतून काढता पाय घ्यावा लागला.

Post a Comment

0 Comments