google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 इंदापूरमधील हॉटेलात तरुणाची गोळ्या झाडून हत्या, बघा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

Breaking News

इंदापूरमधील हॉटेलात तरुणाची गोळ्या झाडून हत्या, बघा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

इंदापूरमधील हॉटेलात तरुणाची गोळ्या झाडून हत्या, बघा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ


गेल्या काही महिन्यांमध्ये पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कोयता गँगचा धुमाकूळ असो किंवा दिवसाढवळ्या गोळीबाराच्या घटना असो, 

यामुळे आता पुण्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनांना आळा बसवण्याचा प्रयत्न पुणे पोलिसांकडून करण्यात येत असला 

तरी आता जिल्ह्यातील इंदापूर येथे एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. इंदापूर शहरातील जगदंबा हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या तरुणासोबत ही घटना घडली.

 काल शनिवारी (ता. 16 मार्च) रात्री ही धक्कादायक घडली असून अविनाश धनवे असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून तो पुण्यातील आळंदी परिसरातील राहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश बाळू धनवे (वय वर्ष 34) हा आपल्या तीन ते चार मित्रांसोबत इंदापूर येथील जगदंब हॉटेलमध्ये जेवणासाठी आला होता. 

त्यानंतर तो आणि त्याचे मित्र जेवत असतानाच त्याच्यावर पाच ते सहा जणांनी हल्ला केला. एकाने पिस्तूलातून अविनाशवर दोन गोळ्या झाडल्या. 

एक गोळी त्याच्या डोक्याच्या उजव्या बाजूला तर दुसरी उजव्या पायाच्या जांघेत घुसली. जागेवरच खाली कोसळलेल्या अविनाशवर कोयत्याने वार करण्यात आले. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले.

इंदापुरातील जगदंब हॉटेलमध्ये घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. घटना घडल्यानंतर काही वेळातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारवाईला सुरुवात केली.

 तर पोलिसांकडून मारेकऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे. या घटनेनंतर अविनाश धनवे याचे मित्र घटनास्थळावरून घाबरून पळून गेले. ज्यानंतर पोलिसांनी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग, बाह्यवळण रस्त्यावर नाकाबंदी केली

 असून अविनाश धनवे आणि त्याचे मित्र हे देखील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. तर, निवडणुकीच्या तोंडावर ही घटना घडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यात परवाना धारक लोकांना त्यांचे हत्यार जमा करण्यास सांगण्यास आले होते. अशात गुन्ह्यात वापरण्यात आलेले हत्यार कुठून आले? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Post a Comment

0 Comments