google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी...घर बसल्या करा मतदान; या नागरिकांसाठी निवडणूक आयोगाची सुविधा

Breaking News

मोठी बातमी...घर बसल्या करा मतदान; या नागरिकांसाठी निवडणूक आयोगाची सुविधा

मोठी बातमी...घर बसल्या करा मतदान; या नागरिकांसाठी निवडणूक आयोगाची सुविधा


लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. लोकसभेच्या 543 जागांसाठी देशभरात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.

 जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगा मार्फत काही नागरिकांना घर बसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

16 एप्रिल ते 1 जून दरम्यान सात टप्प्यांमध्ये देशभरात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. चार जूनला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल. 

या पार्श्वभूमीवर 85 वर्षांपेक्षा जास्त वय असणारे वयोवृद्ध आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असणाऱ्या व्यक्तींना घर बसल्या मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगा मार्फत देण्यात येणार आहे. 

देशभरात 85 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांची संख्या 82 लाख आहे. तर 100 वर्षांपेक्षा जास्त वय असणारे 2.18 लाख मतदार आहेत. तर दिव्यांग मतदारांची संख्या 88.4 लाखांच्या घरात आहे.

घर बसल्या मतदान करण्याच्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी एक फॉर्म भरावा लागणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार “सक्षम” या 

अॅपच्या माध्यमातून फॉर्म भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. फॉर्म भरून जमा केल्यानंतर घर बसल्या मतदान करण्यासाठी सदर व्यक्ती पात्र ठरेल.

बरेच वयोवृद्ध नागरिक मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्यास इच्छुक असतात. अशा मतदारांसाठी सुद्धा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून विविध सुविधांची सोय करण्यात येणार आहे. 

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार सर्व मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, 

स्वच्छतागृह, दिव्यांगांसाठी व्हीलचेअर, मदत केंद्र, मतदार सुविधा केंद्र आणि शेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून दिव्यांग आणि वृद्धांसाठी विशेष सुविधा करण्यात येणार आहेत.

 त्यांच्यासाठी 10 लाख 48 हजार मतदान केंद्रांवर स्वयंसेवक आणि व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याच बरोबर वृद्ध आणि दिव्यांग मतदारांसाठी वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments