google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग! खोटा दस्त करीत जमीन नावावर करून फसवणूक; एकसारखे नाव असल्याने घेतला फायदा; चौघांवर पोलिसात गुन्हा दाखल

Breaking News

ब्रेकिंग! खोटा दस्त करीत जमीन नावावर करून फसवणूक; एकसारखे नाव असल्याने घेतला फायदा; चौघांवर पोलिसात गुन्हा दाखल

 ब्रेकिंग! खोटा दस्त करीत जमीन नावावर करून फसवणूक;


एकसारखे नाव असल्याने घेतला फायदा; चौघांवर पोलिसात गुन्हा दाखल 

मयत असलेल्या मुलीच्या नावे असलेली जमीन चौघांनी मिळून संगनमताने एकाचे नाव करून फसवणूक केली. याबाबत सांगोला पोलिसात सुमन पोपट कोळेकर (४५), हणमंत पोपट कोळेकर (दोघे रा. आंबेगाव, ता. कडेगाव, जि. सांगली),

 रूपेशकुमार रामचंद्र ढवळे (वय ३५, रा.निवरी, ता. कडेगाव), महादेव तायाप्पा वाघमारे (वय ५८ रा. जवळा, ता. सांगोला) यांचे नवे फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

चंद्राबाई पोपट कोळेकर (वय ६०, रा. कोळे, ता. सांगोला) यांनी दाखल केलेली फिर्याद अशी की, २८ मार्च रोजी दुपारी १ वा. चे सुमारास सबरजिस्टरी 

सांगोला येथे यातील फिर्यादी यांची मुलगी सुमन पोपट कोळेकर यांचा दि. ३० सप्टेंबर रोजी २०१० रोजी तातुगडे मळा, सांगलीवाडी येथे मृत्यू झाला होता. 

तरी देखील आरोपी सुमन पोपट कोळेकर, हणमंत पोपट कोळेकर (दोघे रा.आंबेगाव, ता. कडेगाव, जि. सांगली), रूपेशकुमार रामचंद्र ढवळे (रा.निवरी, ता. कडेगाव, ता. सांगोला),

महादेव तायाप्पा वाघमारे (रा. जवळा, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांनी संगनमत करून फिर्यादीची मयत मुलगी सुमन पोपट कोळेकर हिस दि. ११ फेब्रुवारी २००६ रोजी दिवाणी न्यायालय

 सांगोला यांच्या रे.मु.नं ४०/२००६ अन्वये मिळालेली जमीन गट नं ४०१ पैकी ० हे-३३. ५० आर, पो.ख.० हेक्टर १.५० आर ही मिळकत हडप करण्याच्या उद्देशाने सदर मिळकतीचा

आरोपी सुमन पोपट कोळेकर हिने एकसारख्या नावाचा फायदा घेऊन दि. २८ मार्च २०२३ रोजी सबरजिस्टरी सांगोला येथे खोटा दस्त तयार करून आरोपी क्र २ हणमंत पोपट कोळेकर यास विक्री केला

 व रेपेशकुमार रामचंद्र ढवळे, महादेव तयाप्पा वाघमारे यांनी ओळखदार असल्याच्या सह्या केल्या.

अशा प्रकारे आरोपी क्र. १ ते ४ यांनी फिर्यादी यांची मयत मुलगी चे नाव सारखे असल्याचा फायदा घेऊन तिचे नावावरील जमीन फिर्यादी व तिची मयत

 मुलगी यांची फसवणूक करून स्वतःचे नावावर करून फसवणूक केली असल्याची तक्रार चंद्रबई कोळेकर यांनी पोलिसात दिली आहे.

Post a Comment

0 Comments