google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 माढ्यात खा.रणजितसिंह निंबाळकर दोन लाखांच्या मताधिक्याने विजयी होणार - चेतनसिंह केदार-सावंत

Breaking News

माढ्यात खा.रणजितसिंह निंबाळकर दोन लाखांच्या मताधिक्याने विजयी होणार - चेतनसिंह केदार-सावंत

 माढ्यात खा.रणजितसिंह निंबाळकर दोन लाखांच्या मताधिक्याने विजयी होणार - चेतनसिंह केदार-सावंत 


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)


सांगोला (तालुका प्रतिनिधी): गेल्या पाच केलेल्या विकासकामांमुळे माढा लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा भाजपवर प्रचंड विश्वास आहे. लोकसभा मतदारसंघातील जिव्हाळ्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावल्याने

 भाजपचे उमेदवार खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचा दोन लाखांच्या मताधिक्याने विजयहोणार असल्याचा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी व्यक्त केला.

        लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या कोअर कमिटी व चुनाव प्रबंधक समिती बैठक

 सांगोल्यात पार पडली. यावेळी भाजपचे उत्तर मंडल अध्यक्ष अतुल पवार, दक्षिण मंडल अध्यक्ष दुर्योधन हिप्परकर, शिवाजीराव गायकवाड, संभाजी आलदर , नवनाथ पवार, 

डॉ.जयंत केदार, शितल लादे, विजय इंगोले माढा लोकसभा विस्तारक अनंत राऊत, सांगोला विस्तारक हणमंत कर्चे यांच्यासह कोअर कमिटी व चुनाव प्रबंधक समिती सदस्य उपस्थित होते.

      यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत म्हणाले की, 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचे काम करत आहेत. 

त्यामुळे सामान्य मतदारांचा भाजपवर विश्वास आहे की हाच पक्ष देशाला जगातील महासत्ता बनवू शकतो.

 खासदार रणजितसिंह निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मतदारांनी दाखवलेला उत्साह भाजपला बळ देणारा आहे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी टेंभू योजनेमध्ये माणनदीचा समावेश केला, 

म्हैशाळ योजनेतून कोरडा व अप्रुका नदीवरील सर्व बंधारे भरून दिले. तसेच वंचित गावांचा टेंभू व म्हैशाळ योजनेमध्ये समावेश करून

नीरा देवधरच्या प्रकल्पासाठी ९५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याचा फायदा कायम दुष्काळी असणाऱ्या फलटण, सांगोला, माण, खटाव, माढा, करमाळा, माळशिरस तालुक्यातील ५० हजार हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे.

 २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मतदारसघांतील पाण्याचा प्रश्न शिल्लक ठेवणार नसल्याचा मतदारांना शब्द दिला होता. अपेक्षेप्रमाणे मतदारांना दिलेला शब्द खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी पाळला आहे. 

जलजीवन मिशन, शौचालय, हर घर जल, पंतप्रधान आवास योजना, महिला सशक्तीकरण, उज्वला गॅस योजना राबवून मोदींनी गरीबांचे कल्याण केले आहे.

 लोकसभा मतदारसंघात पक्षाची उत्तम संघटनात्मक बांधणी करत, विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून भाजप कार्य करत असून 

लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार खा. रणजितसिंह निंबाळकर यांचा दोन लाखांच्या मतांनी विजय होणार असल्याचा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments