google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक घटना..पत्नीने झोपेत आपल्या दाजीचं नाव घेतल्यानं पतीला आला राग अन…

Breaking News

खळबळजनक घटना..पत्नीने झोपेत आपल्या दाजीचं नाव घेतल्यानं पतीला आला राग अन…

 खळबळजनक घटना..पत्नीने झोपेत आपल्या दाजीचं नाव घेतल्यानं पतीला आला राग अन…


लखनऊ : पती-पत्नीची काही ना काही कारणावरुन वाद होतातच. कधी हे वाद लगेचच मिटतात, तर कधी ते भयानक रूप धारण करतात.

 अनेकदा तर या वादाचं कारण इतकं विचित्र असतं की त्याबद्दल ऐकूनच लोक थक्क होतात.

आता असंच एक प्रकरण उत्तर प्रदेशमधून समोर आलं आहे. ज्यात झोपेत आपल्या दाजीचं नाव घेणं महिलेला चांगलंच महागात पडलं.

युपीच्या रामपूरमध्ये पत्नीने झोपेत वारंवार आपल्या दाजीचं नाव घेतल्यानं पतीला राग आला. पतीने पत्नीवर गंभीर आरोप करत तिला मारहाण केली. पत्नीचं म्हणणं आहे, की तिला एक भयानक स्वप्न पडलं होतं, 

ज्यामुळे तिने आपल्या दाजीचं नाव घेतलं असावं. दोघांमधील वाद वाढल्यावर त्यांनी पोलीस ठाणं गाठलं. पोलिसांनी दोघांनाही समजावून घरी पाठवलं आहे.

आजीमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली. जिथे सहा महिन्यांपूर्वी एका तरुणाचा विवाह झाला होता. तरूणाचा आरोप आहे की, त्याची पत्नी झोपेत 

नेहमी आपल्या दाजीचं नाव घेते. रविवारी रात्री उशिरा पती-पत्नी घरात झोपले असताना ही घटना घडली. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास पत्नीने पुन्हा-पुन्हा दाजीचं नाव घेण्यास सुरुवात केली.

पत्नीच्या तोंडून पतीने दाजीचं नाव वारंवार ऐकताच त्याने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पतीने पत्नीवर गंभीर आरोप करत तिला मारहाण केली. गोंधळामुळे आजूबाजूचे अनेक लोक घटनास्थळी आले. 

पतीने महिलेच्या दाजीला शिवीगाळ करत तिच्यावर गंभीर आरोप केले. तर पत्नी म्हणाली, की मला आधीच भीतीदायक स्वप्नं पडतात. मी स्वप्नात माझ्या दाजीचं नाव घेतलं असावं.

त्यानंतर सकाळ होताच पतीने पत्नीच्या माहेरच्या लोकांना फोन करून गोंधळ घातला. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर पती-पत्नी दोघांनाही पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं. पोलिसांनी दोघांनाही समजावून सांगितलं. 

यानंतर पती-पत्नी त्यांच्या घरी गेले. स्वप्नात दाजीच्या नावाचा वारंवार उल्लेख केल्याने घडलेल्या या अजब घटनेची संपूर्ण परिसरात चर्चा रंगली आहे. .

Post a Comment

0 Comments