google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक...बहिणीच्या 'लव्ह मॅरेज'ला मदत केली म्हणून राग अंगावर चार वेळा बोलेरो कार घालून केली हत्या

Breaking News

खळबळजनक...बहिणीच्या 'लव्ह मॅरेज'ला मदत केली म्हणून राग अंगावर चार वेळा बोलेरो कार घालून केली हत्या

खळबळजनक...बहिणीच्या 'लव्ह मॅरेज'ला मदत केली म्हणून राग अंगावर चार वेळा बोलेरो कार घालून केली हत्या


प्रेमविवाह करण्यासाठी आपल्या मुलीला मदत केल्याच्या रागातून एका पित्याने बाईकवरून जाणाऱ्या मावस भाऊ आणि त्याच्या मुलाला जीपखाली चिरडले. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला. 

थरकाप उडवणारी ही घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज परिसरात काल दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला 

असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. सचिन वाकचौरे असे संशयित आरोपीचे नाव आहे. तर पवन शिवराम लोढे (वय २४) असे मृत तरुणाचे नाव आहे. 

या घटनेत पवनचे वडील शिवराम लोढे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन याच्या मुलीने काही दिवसांपूर्वी प्रेम विवाह केला होता.

 मुलीच्या प्रेमविवाहाला मावस भाऊ आणि त्याच्या मुलानेच मदत केल्याचा संशय सचिनच्या मनात होता. या संशयातून त्याने शेंदूर वाडा ते सावखेडा रस्त्यावर बाईकवरून निघालेल्या मावस भाऊ आणि त्याच्या मुलाला जीपने उडवले. 

धक्कादायक बाब म्हणजे, पवन खाली पडल्यानंतर आरोपीने त्याच्या अंगावर चार वेळा बोलेरो कार घालून त्याची हत्या केली. हत्येनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Post a Comment

0 Comments