google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 माढा लोकसभेसाठी डॉ. अनिकेत देशमुख यांची उमेदवारी तरुणांमध्ये उत्साह वाढवणारी ठरेल :- ॲड. अभिषेक कांबळे.-डॉ.अनिकेत देशमुखांच्या रूपाने संसदेत जाईल सांगोला तालुक्यातील पहिला खासदार

Breaking News

माढा लोकसभेसाठी डॉ. अनिकेत देशमुख यांची उमेदवारी तरुणांमध्ये उत्साह वाढवणारी ठरेल :- ॲड. अभिषेक कांबळे.-डॉ.अनिकेत देशमुखांच्या रूपाने संसदेत जाईल सांगोला तालुक्यातील पहिला खासदार

 माढा लोकसभेसाठी डॉ. अनिकेत देशमुख यांची उमेदवारी तरुणांमध्ये उत्साह वाढवणारी ठरेल :- ॲड. अभिषेक कांबळे.-डॉ.अनिकेत देशमुखांच्या रूपाने संसदेत जाईल सांगोला तालुक्यातील पहिला खासदार 



सांगोला / प्रतिनिधी( शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये इंडिया आघाडी मोठ्या ताकतीने लोकसभेची निवडणूक लढवत असुन

 संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात अद्याप उमेदवार निश्चित झाला नाही. 
भारत हा तरुणांचा देश म्हणून जगभरामध्ये ओळखला जातो.  राजकारणामध्ये तरुणांना संधी दिल्यास

 ते समाजामध्ये सकारात्मक बदल घडवू शकतात त्यामुळे
 माढा लोकसभेसाठी महाविकास आघाडी कडून उच्चशिक्षित तरुण डॉ. अनिकेत देशमुख यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे यांनी केली आहे.

    राजकारणा मध्ये अत्यंत स्वछ चारित्र्य, वैचारिक आणी प्रभावी नेतृत्व केलेले आणी राजकारणातील मुरब्बी म्हणून ओळखले जाणारे 

स्व.भाई गणपतराव देशमुख यांचे मार्गदर्शन भीष्मपितामह सारखे डॉ.अनिकेत देशमुख यांना लाभले आहे डॉ.अनिकेत देशमुख हे

 स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू असून ते एक स्वच्छ चारित्र्यसंपन्न उमेदवार ठरतील उच्चशिक्षित तरुण उमेदवार आपल्या माढा लोकसभेला त्यांच्या रूपातून मिळेल 

तसेच महाराष्ट्रातील लोकसभेत जाणारा पहिला धनगर समाजाचा खासदार म्हणून त्यांच्या रूपात धनगर समाजाला प्रतिनिधित्व करायची एक संधी इंडिया आघाडीने द्यावी.

   स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबीयांचे माढा लोकसभेतील सर्वच राजकीय नेत्यांसोबत कौटुंबिक संबंध राहिले
 आहेत याचे उदाहरण द्यायचे झाले तर करमाळा येथील नामदेवराव जगताप यांच्यासह बागल मामांना देखील

 त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये मोलाचे सहकार्य लाभले आहे तसेच माढा येथील शिंदे घराणे यांच्यासह फलटणचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर यांना विधानसभेमध्ये सभापती पद मिळवून देण्यात 

त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे माळशिरसचे मोहिते-पाटील यांच्या सोबत त्यांचे तीन पिढ्यांचे ऋणानुबंध राहिले आहेत 

जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते-पाटील आणि स्व.गणपतराव देशमुख यांचे सौख्य सर्वांना परिचित आहे
 तर करमाळ्याचे आमदार संजयमामा यांना डी.सी.सी बँक,  दूध संघ, जिल्हा परिषद येथील संस्थात्मक राजकारणात नेहमीच त्यांनी नेहमीच मदत केली आहे 

या सर्व बाबींचा विचार करता महाविकास आघाडी कडून माढा लोकसभा मतदारसंघात विजयीरथ खेचून आणण्यासाठी स्व. आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख हेच प्रबळ दावेदार ठरू शकतात. 

    महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी  याचा विचार करून डॉ. अनिकेत देशमुख यांच्यासारख्या तरुण,स्वच्छ चारित्र्य संपन्न उमेदवाराला उमेदवारी देऊन माढा मतदारसंघातील
 धनगर समाजासोबत न्याय करावा अशी मागणी 
सांगोला काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष अभिषेक कांबळे यांनी केली

 यावेळी महिला जिल्हा उपाध्यक्ष मैना ताई बनसोडे,शहराध्यक्ष तोहीत मुल्ला,तालुका उपाध्यक्ष संतोष ऐवळे, ओबीसी सेल अध्यक्ष रमेश पाटणे,

उपाध्यक्ष अक्षय महामुनी,अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष सादिक शेख, ता.संघटक विनोद वाघमारे,दीपक कांबळे, सिद्धेश्वर देशमुख,इंनूस 

मुलाणी, संदीप कोळेकर उपस्थित होते 

(चौकट - डॉ.अनिकेत देशमुख यांना लोकसभा निवडणुकीत विरोध केल्यास पंढरपूर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कश्या पद्धतीने धनगर समाजाने भगीरथ चा विजयी रथ रोखला होता याच भान सर्वाना असल्याची चर्चा सर्वत्र आहे.)

Post a Comment

0 Comments