खुशखबर ...शेतकऱ्यांनो PM किसानचा 16 हप्ता आज जमा होणार
शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकारने विविध योजना आणल्या आहेत. यातीलच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना. अशातच आता आज शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 6000 रुपये जमा होणार आहेत. कारण पंतप्रधान किसान सन्मान निधीसह राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकाचवेळी राज्य आणि केंद्राचे मिळून 6000 रुपये जमा होणार आहेत.
पीएम किसान योजनेचे 2000 रुपये तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता मिळून 4000 रुपये असे एकुण 6000 रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत.
0 Comments