मंगळवेढा तालुक्यातील घटना खळबळजनक घटना! पाणी समजून किटकनाशक प्याल्याने तरूणाचा मृत्यू;
मंगळवेढा तालुक्यातील तळसंगी येथे हरभरा पिकावर फवारणीसाठी तयार केलेले किटकनाशक मिश्रण पाणी समजून पिल्याने
एका ३८ वर्षीय तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली असून नवनाथ बाबासाहेब कोडग असे मृत तरूणाचे नाव आहे. दरम्यान या घटनेची नोंद पोलिसात आकस्मात मयत अशी झाली आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील मयत नवनाथ कोडग याने दि.१८ फेब्रुवारी रोजी रात्री १०.०० वा. हरभरा पिकावर मारण्यासाठी किटकनाशक औषध मिश्रण प्लॅस्टिकच्या बादलीमध्ये तयार करून ठेवले होते.
ते पाणी समजून नवनाथ कोडग याने पिल्याने त्यास उपचाराकरीता मंगळवेढ्यातील महिला हॉस्पीटलमध्ये दाखल केले होते. दोन दिवसानंतर पूर्ण शुध्दीवर आल्यावर बरे वाटू लागल्यानंतर हॉस्पीटलमधून डिस्चार्ज घेवून घरी नेले होते.
दि.२६ रोजी दुपारी २.०० वा. नवनाथ कोडस यास श्वसनाचा त्रास होवू लागल्याने पुन्हा हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यासाठी नेत असताना तो रस्त्यात बेशुध्द झाला.
त्याला उपचारासाठी दाखल केल्यावर तेथील डॉक्टरांनी तो मयत झाल्याचे सांगितले. याची खबर समाधान कोडग यांनी दिल्यावर मंगळवेढा पोलिसात आकस्मात मयत अशी नोंद झाली आहे.
0 Comments