ब्रेकिंग! फेसबुक लाईव्हसाठी सोबत बसले अन् गोळ्या झाडल्या थरकाप उडवणारी घटना..
मुंबईत भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात गोळीबार केल्याचे प्रकरण ताजे होते. अशातच मुंबईत आणखी एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे.
माजी आमदार विनोद घोसाळकर आणि ठाकरे गट नेते, माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर दहिसरमध्ये गोळीबार झाला आहे. मॉरिस नावाच्या व्यक्तीने हा हल्ला केला.
मॉरिसने स्वत:वरही गोळ्या झाडल्या होत्या. या घटनेत घोसाळकर आणि मॉरिस दोघांचा मृत्यू झाला आहे. गोळीबारापूर्वी अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस नोरोन्हाने फेसबुक लाईव्ह केले होते.
त्यानंतर मॉरिस उठला आणि त्याने अभिषेक यांच्यावर गोळीबार केला. यात अभिषेक यांना चार गोळ्या लागल्या होत्या. तर, मॉरिसने स्वत:वर चार गोळ्या झाडून घेतल्या.


0 Comments