google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक घटना...पोलिस आत्महत्याप्रकरणात संशयित महिलेला अटक, दुसऱ्याचा तपास सुरु - काय सांगता

Breaking News

खळबळजनक घटना...पोलिस आत्महत्याप्रकरणात संशयित महिलेला अटक, दुसऱ्याचा तपास सुरु - काय सांगता

सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना...


पोलिस आत्महत्या प्रकरणात संशयित महिलेला अटक, दुसऱ्याचा तपास सुरु - काय सांगता

करमाळा (सोलापूर) : करमाळा पोलिस ठाणे येथे कार्यरत असलेल्या एका पोलिसाने काल (बुधवारी) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास आत्महत्या केली होती.

 याची माहिती समजताच पोलिसांनी तत्काळ तपास करून संशयित पत्नीला (महिला पोलिस) अटक केली आहे. यातील गुन्हा दाखल झालेला दुसरा संशयित आरोपी पोलिस फरार आहे. 

या प्रकरणात दोघांविरुद्ध करमाळा पोलिसात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. आकाश तोगे (वय २६) असे आत्महत्या केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

मिळलेल्या माहितीनुसार आत्महत्या केलेले तोगे हे करमाळा पोलिस ठाण्यात कार्यरत होते. 

त्यांची पत्नी देखील करमाळा पोलिस ठाण्यातच कार्यरत होती. तोगे यांना पत्नी व पोलिस ठाण्यातील एक पोलिस यांच्यात अफियर असल्याचा संशय होता.

 त्यातुनच त्यांनी आत्महत्या केली असल्याचे सांगितले जात आहे. त्यावरून पत्नी व एका पोलिसाविरुद्ध आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 

या घटनेमुळे आज संपूर्ण पोलिस ठाण्यात याच घटनेची चर्चा सुरु होती. पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्री. चंदनशिवे हे याचा तपास करत आहेत.

तोगे यांनी आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली होती. राहत्या घरी गळफास घेऊन त्यांनी ही आत्महत्या केली.

 तोगे यांची काही दिवसांपूर्वीच करमाळा पोलिस ठाण्यात बदली झाली होती. तोगे हे अतिशय शांत स्वभावाचे होते.

Post a Comment

0 Comments