सोलापूर जिल्ह्यातील 'या' २२ ग्रामसेवकांना आदर्श पुरस्कार!
११ ग्रामपंचायतींना १० लाख रूपयांचे बक्षिस, सांगोल्यातील 'ही' ग्रामपंचायत ४० लाख रूपयांची मानकरी
सोलापूर : राज्य शासनाच्या आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव योजनेअंतर्गत उद्या (शुक्रवारी) पालकमंत्री चंद्रकांत पाटील व आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते
प्रत्येक तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यांचा पारितोषिक देऊन सन्मान केला जाणार आहे.जिल्हास्तरावर माढ्यातील वडाचीवाडी आऊ या ग्रामपंचायतीची निवड झाली आहे.
स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक ऊर्जा व पर्यावरण रक्षण, पारदर्शकता व तंत्रज्ञानाचा वापर अशा मुद्द्यांवर १०० गुण देऊन प्रत्येक तालुक्यातून एक
आणि जिल्ह्यातून एक ग्रामपंचायतीची आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव योजनेसाठी निवड करण्यात आली आहे.
तालुकास्तरावर प्रथम आलेल्या ग्रामपंचायतीला प्रत्येकी दहा लाख रुपयांचे तर जिल्हास्तरीय ग्रामपंचायतीला ४० लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे.
या ग्रामपंचायतींची निवड झाली असून शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता पंढरपुरातील श्री यश पॅलेस येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील,
आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडणार आहे.
यावेळी सर्व आमदार, खासदार, जिल्हा परिषदेचे अधिकारी उपस्थिती असतील. प्रत्येक कुटुंबाकडे स्वच्छतागृह, दारूबंदी, प्लास्टिक बंदी, वृक्ष लागवड, शाळा,
आरोग्य सुविधा, स्वच्छता, ग्रामपंचायतीची ऑनलाइन सुविधा, बचतगटांशी अधिकाधिक महिला संलग्न, ग्रामपंचायतीचा कर १०० टक्के वसूल, अशा बाबींचाही विचार निवडीवेळी करण्यात आला आहे.
'सुंदर गाव'साठी निवडलेल्या ग्रामपंचायती
तालुका ग्रामपंचायत
अक्कलकोट वागदरी
बार्शी अंबाबाईची वाडी
करमाळा खडकी
माढा वडाचीवाडी आऊ
माळशिरस पुरंदावडे
मंगळवेढा बालाजीनगर (लमाण तांडा)
मोहोळ आष्टी
उत्तर सोलापूर कौठाळी
पंढरपूर तिसंगी
सांगोला वाकी शिवणे
द.सोलापूर दिंडुर
२२ ग्रामसेवकांचाही होणार सन्मान
२०२१-२२ या वर्षात आदर्श ग्रामसेवक म्हणून रेखा इगवे, किरण वाघमारे, मनोज लटके, समीर शेख, राजकुमार काळे,
राहुल कांबळे, राजअहमद मुजावर, शहाजी शेणवे, डी.एस. गोतसूर्य, भालचंद्र निंबर्गी, एन.बी. जोडमोटे यांची निवड झाली.
तसेच २०२२-२३मध्ये अभयकुमार नेलुरे, रामेश्वर भोसले, सचिन सरडे, शिवाजी गवळी, सत्यवान पवार, अभिजित लाड, उज्वला उमाटे, अविनाश ढोपे, योगिता शिंदे,
शशिकांत कुंभार व कल्पना नारायणकर यांची निवड झाली. या सर्वांचाही सन्मान उद्या (शुक्रवारी) पालकमंत्री व आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.


0 Comments