google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज.,माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन

Breaking News

ब्रेकिंग न्यूज.,माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन

 ब्रेकिंग न्यूज.,माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन


मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन झाले आहे. स्व.जोशी यांना बुधवारी (दि.२१ फेब्रुवारी) हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मनोहर जोशी यांना मे २०२३ मध्ये ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला होता. त्यावेळी सुद्धा त्यांना हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

 न्यूरोलॉजिस्ट डॉ. चारुलता संकला यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले होते.

 मात्र  त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र डॉक्टरांच्या निगराणी खाली ते आयसीयूमध्ये आहेत.

राजकारण गेल्या काही काळापासून सक्रिय नाही

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेले मनोहर जोशी हे मूळचे बीडचे आहेत. त्यांचा जन्म दि.२ डिसेंबर १९३७ मध्ये रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. मनोहर जोशी यांचं वय ८६ आहेत. शिक्षणाच्या निमित्ताने ते मुंबईत स्थलांतरित झाले 

आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना मुंबई महानगरपालिकेत अधिकाऱ्याची नोकरी मिळाली. त्यानंतर ते मुंबईत स्थायिक झाले. काही काळानंतर त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत काम करण्यास सुरुवात केली. 

शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडून येत त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द सुरु केली होती. १९७६ ते १९७७ या काळात ते मुंबईचे महापौरही झाले. १९९५ साली राज्यात जेव्हा युतीची सत्ता आली, 

त्यावेळी मनोहर जोशी यांच्याकडे राज्याचे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. मात्र आता वय आणि प्रकृतीच्या कारणामुळे ते मागील काही काळापासून राजकारणात सक्रिय नाही. 

त्यांनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अशा विविध पदांवर काम केले आहे.

Post a Comment

0 Comments