माजी प्राचार्य मा. सुब्राव बंडगर, मा. प्रा. डॉ. विधिन कांबळे व माजी प्राचार्य मा. डॉ. बी. आर. फुले यांच्या हस्ते
प्रा. अंजली जाधव यांच्या “बेटियों की सिसकीयाँ”, “मधला” व “काव्य कलियाँ” या पुस्तकांचे प्रकाशन.....
(शब्दरेखा एक्सप्रेस संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी प्रा. अंजली जाधव यांच्या तीन पुस्तकांचे प्रकाशन माजी प्राचार्य मा. सुब्राव बंडगर, प्रा. डॉ. विधिन कांबळे (सांगोला कॉलेज, सांगोला) व माजी प्राचार्य डॉ. बी. आर. फुले यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रा. अंजली जाधव यांची तिन्ही पुस्तके अतिशय चांगल्या पद्धतीचे साहित्यिक योगदान आहे. त्यांची बरीच पुस्तके उत्कृष्ठ दर्जा ची आहेत.
त्यांची “बेटियों की सिसकीयाँ”, ‘मधला’ व ‘काव्य कलियाँ’ या पुस्तकांचे प्रकशन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी प्राचार्य मा. सुब्राव बंडगर, मा. प्रा. डॉ. विधिन कांबळे व मा. प्राचार्य डॉ. बी. आर फुले यांच्या हस्ते झाले. 'काव्य कलियाँ' या काव्यसंग्रहात हिंदी कवितांचा समावेश आहे,
'बेटियों की सिसकीयाँ' या काव्यामध्ये महिलांचे दुःख-वेदना-भावना- सुख-दुख याचे वर्णन आहे तर 'मधला' ही थर्ड जेंडरवर आधारीत ‘दरमियाना’ या हिंदी उपन्यासाचा मराठी अनुवाद आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी प्राचार्य मा. सुब्राव बंडगर यांनी साहित्य हि कला माणसाच्या आयुषांमध्ये किती महत्वपूर्ण असून साहित्य मध्ये समाज बदलण्याची खरी ताकत आहे असे मत मांडले,
कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख पाहुणे मा. प्रा. डॉ. विधिन कांबळे यांनी प्रा. कु. अंजली जाधव यांच्या या साहित्यिक सेवेचे कौतुक केले. साहित्याची आवड हल्ली लोकांची जरी कमी होत असली तरी त्याचे महत्व झाले नाही आणि होणार पण नाही असे मत त्यांनी मांडले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. बी. आर. फुले यांनी साहित्याची गरज समाजासाठी महत्वपूर्ण आहे, असे मत मांडून प्रा. अंजली जाधव हिंदी व मराठी साहित्य क्षेत्रात आपली ओळख निर्माण करत आहेत असे म्हणाले.
या कार्यक्रमाचे आभार श्री विलास पाटील सर यांनी मानले तर सूत्रसंचालन श्री. प्रा.डॉ. नागन्नाथ घोरपडे सर यांनी केले. या कार्यक्रमास मा. श्री. सतीश सावंत, श्री. विनोद चंदनशिवे व इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमास अडवकेट दत्तात्रय घाडगे, श्री नागेश जोशी (पत्रकार, माजी नगरसेवक संस्थापक/ अध्यक्ष, ब्राम्हण सभा सांगोला, सचिव भस्टाचार जनंदोलन समिती, सचिव कामगार संघटना संस्थापक पुरोहित
संघटना, संस्थापक मार्गदर्शक श्री अंबिका देवी यात्रा संघर्ष समिती सांगोला), सौ नम्रता जोशी ( शेतकरी महिला सह वस्त्र निर्माण सूतगिरणी सांगोला संचालिका ) श्री संग्राम काटे ( फिल्म अभिनेता प्रोडूसर डायरेक्टर), श्री विजय मासाळ ( प्रसिद्ध अभिनेता),
श्री गिरीश कुलकर्णी टायपिस्ट, मा.विलास पाटील सर (सेवा निवृत्त शिक्षक कन्या प्रशाला), श्री विनोद चंदनशिवे ( सांगोला नगरी ऑफिस संचालक), अलिशा खाटीक ( सांगोला नगरी स्टाफ मेंबर), श्री चंद्रशेखर हिरेमठ सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मा. सौ नम्रता जोशी यांनी प्रा. अंजली जाधव यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राध्यापक चंद्रशेखर हिरेमठ सर यांनी प्राध्यापिका अंजली जाधव या अडचणीतून आपला आदर्श व्यक्तिमत्व निर्माण करणाऱ्या मूर्तिमंत उदाहरण आहे असे मत मांडले.
यावेळी प्राध्यापक विलस पाटील सर यांनी ही अंजली माझी विध्यार्थिनी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे असे मत मांडले.
यावेळी मा. सौ नम्रता जोशी यांचा सलग तीन वेळा महिला सह वस्त्र निर्माण सूतगिरणी सांगोला मध्ये संचालिका
म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला व प्रा. अंजली जाधव यांचा नारी सन्मान पुरस्कार २०२४ जाहीर झाल्याबद्दल माजी प्रचार्य मा. सुब्राव् बंडगर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रा. अंजली जाधव यांना शैक्षणिक समाजिक साहितिक कार्यासाठी यापूर्वी २६ पुरस्कर मिळाले आहेत सध्या त्यांची सोलापूर विद्यापीठामध्ये तृतीयपंथी लोकांवर पी. एच. डी. चालू आहे.
0 Comments