google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक ...2 लेकरांचे आईने केले तुकडे, शेतात टाकून फरार झाली; कारण ऐकून पोलीस हादरले

Breaking News

धक्कादायक ...2 लेकरांचे आईने केले तुकडे, शेतात टाकून फरार झाली; कारण ऐकून पोलीस हादरले

धक्कादायक ...2 लेकरांचे आईने केले तुकडे, शेतात टाकून फरार झाली; कारण ऐकून पोलीस हादरले


सध्याच्या युगाला कलियुग म्हणतात. कारण यात कोणाचा काही भरवसा देता येत नाही. कोण कधी कोणाच्या जिवावर उठेल आणि कधी कोणाचा घात करील, याबद्दल काहीच सांगता येत नाही. याचा प्रत्यय येणाऱ्या अनेक घटना घडत

 असल्याचं वाचायला मिळत असतं. अशीच एक घटना हरियाणात घडली आहे. एका महिलेने आपल्या दोन मुलांची हत्या करून त्यांचे मृतदेह शेतात टाकून ती फरार झाली.

हरियाणा राज्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. रुबी असं आरोपी महिलेचं नाव असून, तिने आपल्या प्रियकरासोबत मिळून वंश आणि यश या आपल्या दोन मुलांची हत्या केली आहे. 

वंश 10 वर्षांचा होता, तर यशचं वय सात वर्षं होतं. या दोघांची हत्या करून त्यांचे मृतदेह बागपतमधल्या उसाच्या शेतात टाकून महिला फरार झाली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्ट-मॉर्टेमला पाठवले आहेत.

ही महिला सोनिपतची रहिवासी आहे. तिचा पतीशी घटस्फोट झाला होता. ती आपल्या दोन मुलांसह राहत होती. मुलांना आपल्या मार्गातून बाजूला करून तिला आपल्या प्रियकराशी लग्न करायचं होतं. 

म्हणून तिने प्रियकरासोबत मिळून आपल्या मुलांची हत्या केली. आपल्या पतीला या प्रकरणात अडकवण्याचा तिचा इरादा होता. म्हणून मुलं गायब झाल्यावर तिने आपल्या पतीवर मुलांच्या हत्येचा आरोप केला होता.

पोलिसांनी माहिती दिली, की त्या महिलेने आपल्या पतीवर मुलांच्या हत्येचा आरोप केला होता आणि एफआयआर दाखल केला होता. पोलिसांनी या प्रकरणी तपास केला असता त्यात धक्कादायक बाब उघड झाली. 

मुलांची हत्या जन्मदात्या आईनेच केल्याचं तपासात उघड झालं. पोलिसांनी आता आरोपी रुबी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतलं आहे. त्यांची चौकशी केली जात आहे.

Post a Comment

0 Comments