ब्रेकिंग न्यूज....राष्ट्रवादी पक्ष व चिन्ह अजितदादांकडे; निवडणुक आयोगाचा मोठा निर्णय..!
केंद्रीय निवडणुक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादीची सर्व सुत्रे अजितदादांकडे आल्यामुळे आगामी काळात राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपसोबत सत्तेत सहभाग घेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि चिन्हावरही दावा केला होता. त्यानंतर निवडणुक आयोगात दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकून घेण्यात आले.
आज निवडणुक आयोगाने पक्ष आणि चिन्हावरील अजित पवार यांच्या गटाचा दावा मान्य करत पक्ष आणि चिन्ह अजितदादांकडे देण्याचा निर्णय घेतला आहे.
येत्या काही दिवसात राज्यसभा निवडणुक होत आहे. त्यानंतर काहीच दिवसात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु राहणार आहे.
अशातच आता पक्षाचे नाव, चिन्ह अजित पवार यांच्या गटाला मिळाल्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर आता राज्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
0 Comments