google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक प्रकार...आटपाडी येथे बेकादेशीरपणे गर्भपात ; आटपाडी शहरातील घटना ; पती, सासू सह सांगोला येथील महिलेवर गुन्हा दाखल

Breaking News

धक्कादायक प्रकार...आटपाडी येथे बेकादेशीरपणे गर्भपात ; आटपाडी शहरातील घटना ; पती, सासू सह सांगोला येथील महिलेवर गुन्हा दाखल

धक्कादायक प्रकार...आटपाडी येथे बेकादेशीरपणे गर्भपात ;


आटपाडी शहरातील घटना ; पती, सासू सह सांगोला येथील महिलेवर गुन्हा दाखल 

आटपाडी शहरामध्ये विवाहित महिलेचा अवैधपणे गर्भपात करण्यात आला असून, या प्रकरणी विवाहतेचा पती,

 सासू सह सांगोला येथील महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाने आटपाडी तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, आटपाडी शहरातील हॉटेल दरबार दिघंची रोड कारखाना पाटी ते आवळाई रोड येथील 100 मी अंतरावरील शेतातील एका घरामध्ये (शेडजवळ)  सदरची घटना घडली आहे.

यातील पिडीतीला दोन मुली आहेत. सदर पिडीत महिला ही गर्भवती आहे हे माहित असून सुद्धा आरोपी 

महिलेची सासू मिनाक्षी लक्ष्मण बालटे व आरोपी पीडितेचा पती विजय लक्ष्मण बालटे यांनी गर्भपात करणेसाठी वरील ठिकाणी तिला आणले होते. 

आरोपी मनिषा दिपक आवळे रा सांगोला हिने यातील पिडीतेस गर्भपात होणेसाठी गोळ्या दिल्या आहेत. तरी वरील सर्व आरोपी यांनी पिडीतेचा गर्भपातच प्रयत्न केला.

 याबाबत वैद्यकीय अधिक्षक डॉ. वृषाली राऊत यांनी फिर्यादी दिली असून सदर आरोपी विरुद्ध आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments