google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज..शब्द खरा करणारा दादा! सर्व महापुषांचे पुतळा परिसर विकसित करणे कामास प्रशासकीय मंजुरी मिळाली; अजितदादांनी दिलेला शब्द पाळला

Breaking News

ब्रेकिंग न्यूज..शब्द खरा करणारा दादा! सर्व महापुषांचे पुतळा परिसर विकसित करणे कामास प्रशासकीय मंजुरी मिळाली; अजितदादांनी दिलेला शब्द पाळला

ब्रेकिंग न्यूज..शब्द खरा करणारा दादा! सर्व महापुषांचे पुतळा परिसर विकसित करणे


कामास प्रशासकीय मंजुरी मिळाली; अजितदादांनी दिलेला शब्द पाळला

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरण करणे, 

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसर सुशोभीकरण करणे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा परिसर सुशोभीकरण करणे कामास

 जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय मंजुरी दिली.गेल्या एक वर्षापासून सर्व कामाचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय यांचे कडे निधी मंजूरी साठी पाठविले होते परंतु काही जणांच्या अडवणुकिमुळे प्रलंबित होते,

परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मंगळवेढा तालुक्यातील शिष्टमंडळाने भेटून ही गोष्ट सांगितल्यानंतर दादानी तात्काळ जिल्हाधिकारी यांना दूरध्वनी वरून आदेश देवून नवीन प्रस्ताव दाखल करून घेण्यास सांगितले

व त्यानुसार जिल्हाधिकारी यांचेसमवेत दि.३ फेब्रुवारी रोजी सोलापूर कार्यालयात बैठक घेऊन सर्व महापुरुषाचे परिसर सुशोभीकरण विकसित करणे कामासाठी निधी मंजूर करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार जिल्हाधिकारी सोलापूर यांनी सदर प्रस्तावास प्रशासकिय मंजुरी व निधी वितरीत केला.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेला शब्द अखेर खरा केल्यामुळे मंगळवेढा शहर व तालुक्यतून सर्व समाजबांधवामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

0 Comments