google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोल्याचा झंझावात नवी मुंबईत पोहोचला बाबासाहेबांच्या नावाचा प्रचंड जयजयकार आम्ही पाहिला....

Breaking News

सांगोल्याचा झंझावात नवी मुंबईत पोहोचला बाबासाहेबांच्या नावाचा प्रचंड जयजयकार आम्ही पाहिला....

सांगोल्याचा झंझावात नवी मुंबईत पोहोचला बाबासाहेबांच्या नावाचा प्रचंड जयजयकार आम्ही पाहिला....  




लाल सलाम आयुष्यात कधीच आबासाहेबांना पाहण्याचा योग आला नाही .आबासाहेब कसे होते कसे दिसायचे त्यांची कार्यपद्धती काय होती त्यांचा लोकसंपर्क कसा होता

 हे कधीच अनुभवता आली नाही .आतापर्यंत खूप सारे लेख लिहिले खूप वाचनही केले त्यांच्या जीवनावर. पण त्यांच्या कार्याचा अनुभव त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा दरवळीत असणारा सुगंध कधी घेता आला नाही. 

पण काल मी जे अनुभवले ते प्रचंड म्हणजे प्रचंडच होते.आमच्या नवी मुंबई परिसरात सोलापूर जिल्ह्यातले विशेष म्हणजे सांगोला तालुक्यातील रहिवासी मोठ्या प्रमाणात राहतात.

त्या बांधवांच्या वतीने आदरणीय दिवंगत विश्वविक्रमवीर आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू पुरोगामी युवक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भाई डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा जो भव्य सत्कार करण्यात आला

 तो डोळ्यांचे पारणे फेडणारे असाच होता. काय त्यांची व्यक्ती शैली काय त्यांचे ऊर्जेने बोलणे काय त्यांना मिळणारा प्रचंड प्रेम लहानग्यांपासून तरुणांपर्यंत म्हाताऱ्यांपर्यंत प्रचंड क्रेझच बाबासाहेब या नावाची होती. 

प्रत्येकाच्या मुखात एक मुखाने पुढची साठ वर्ष ही लालबावट्याचीच असतील हे अधोरेखित करणारे शब्द होते. आदरणीय सरचिटणीस जयंत पाटील साहेबांनी बाबासाहेबांसाठी 

उच्चारलेला प्रत्येक शब्द मनोधैर्य वाढवणारा असाच होता.ज्या आबासाहेबांना तुम्ही मतदारांनी जेवढ्या मतांनी निवडून दिलेस अकरा वेळेला त्यापेक्षा दुप्पट मतांनी बाबासाहेबांना निवडून द्या. 

या शब्दावर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. आम्हा प्रत्येकाचे मन अगदी भारावून गेले. आमच्या नवी मुंबई परिसरात उलवे नोड येथे विविध प्रकल्पांचे लोकार्पण केल्यानंतर

 शेकाप नेते राजेंद्र पाटील यांनी त्यांना आपल्या आगरी कोळी संस्कृतीची ओळख करून दिली आणि आगरी कोळी समाजाचा प्रतीक असणारी टोपीही त्यांना परिधान केली. 

आमच्या उरण शेकापतर्फे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. पनवेलचे सामाजिक रत्न प्रीतम दादा म्हात्रे यांच्या हळदीकुंकू संभारंभात त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. 

तसेच आमच्या सुरुवात शेकापच्या नवनिर्माणाची या ग्रुप मार्फत त्यांना कोळी टोपी परिधान करण्यात आली व त्यांचा सत्कार करण्यात आला. 

हा उमद्या मनाचा माणूस आबासाहेबांचा फक्त वैचारिक वारसदारच नाही तर प्रतिरूप का आहे याचा प्रत्यय त्यांना मिळणाऱ्या प्रचंड प्रेमावरूनच आला...
म्हणून एवढेच मग बोलेन
    
 शेकापच्या नवनिर्माणासाठी आबासाहेबांना  बाबासाहेबांच्या रूपात परत यावेच लागले
संघर्षाचे आणि विचारांचे शस्त्र घेऊन

 जनतेच्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावर उतरावेच लागले वैचारिक वारसदारच नाही तर प्रतिरूप आहे बाबासाहेबांचा सांगोलकरांनो पटतोय का तुम्हाला हाच राजा आहे

 तुमच्या मनातला
आबासाहेबांनंतर कोण हा आता प्रश्न राहिलाच नाही काय झाडी काय हाटील म्हणणाऱ्या गद्दाराला सांगा तुझा हिशोब करायला आलाय बाबासाहेब आमचा... बाबासाहेब आमचा...
निवेदक
शेकाप प्रचारक
संदीप पाटील दिघोडेकर

Post a Comment

0 Comments