खळबळजनक घटना....झोपेतच पतीने केली पत्नीची....
पत्नीचा गळा आवळला हातोडीने डोक्यात १२ घाव घातले आणि पत्नीचा खून...
नैराश्यामध्ये कोण काय करील, हे सांगता येत नाही. अनेकदा नैराश्यातून खून, आत्महत्या झाल्याच्या घटना घडतात.
छत्रपती संभाजीनगरमधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.कंपनी बंद पडली म्हणून नैराश्यात पतीने झोपेतच पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेबाबत सविस्तर जाणून घेऊ या.
छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी परिसरात पतीने झोपेतच पत्नीचा गळा आवळला. त्यानंतर हातोडीने डोक्यात १२ घाव घातले आणि पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
लीला निवृत्ती नाफडे असं या मृत महिलेचं नाव आहे. आरोपी निवृत्ती नाफडेला मुकुंदवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.आरोपी पती व्हिडिओकॉन कंपनीत नोकरीला होता.
परंतु, काही दिवसापूर्वी ती कंपनी बंद पडली आणि नोकरी गेली. त्यामुळं आर्थिक विवंचना आणि मानसिक तणावात असलेल्या पतीने मध्यरात्रीत पत्नीचा झोपेतच खून केलाय.
त्यानंतर आपल्या मुलाला व्हिडिओ कॉल करून पत्नीचा मृतदेह दाखवला. त्याने स्वत:च या कृत्याची माहिती दिली आहे. आरोपी व्हिडिओकॉन कंपनीत नोकरीला होता. परंतु कंपनी बंद पडली आणि काम गेलं.
त्यानंतर त्यांना आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागत होतं. यामुळे तो नैराश्यात गेला होता. अनेकदा तो आत्महत्या करण्याच्या गोष्टी करत होता. तो मानसिक तणावामध्ये होता. यातूनच त्याने हे टोकाचं पाऊल उचललं आहे.
या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली होती.कंपनी बंद पडल्यानंतर निवृत्तीच्या वागण्यात बदल होत गेला होता. दरम्यान पहाटे गाढ झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात त्याने हातोडीने घाव केले.
१२ वेळेस पत्नीच्या डोक्यावर हातोडीने वार केले. हातोडीने डोके ठेचून काढले. यातच पत्नी लीलाचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने मुलाला व्हिडिओ कॉल करून या कृत्याची माहिती दिली.
मुलाने तातडीने पोलिसांना फोन केला. घटनेची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी घरातच बसलेला होता.
लिला यांचा मृतदेह रुग्णालयात रवाना करुन पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. मुलाच्या तक्रारीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करुन आरोपी वडिलांना अटक करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.
0 Comments