धक्कादायक प्रकार....! माहेरचा हट्ट नडला विवाहितेने विषारी औषध प्राशन करुन केली आत्महत्या;
मंगळवेढा तालुक्यातील घटना
एका २५ वर्षीय विवाहित महिलेने माहेरी येण्याच्या कारणावरुन द्राक्षावर मारण्याचे विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना कात्राळ येथे घडली
असून रेश्मा रवी पाटील असे मयत विवाहितेचे नाव आहे. दरम्यान मंगळवेढा पोलीसात अकस्मात मयत अशी नोंद झाली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी श्रीकांत कुलकर्णी (रा. वळसंग ता.जत जि.सांगली) यांची मयत मुलगी रेश्मा पाटील (वय २५) हिचा शिरढोण (ता. चडचण जि. विजापूर) येथील नातेवाईक रवी हरी पाटील यांच्याशी विवाह झाला होता.
मयत रेश्मा हिचा पती सी.आर.पी.एफ. मध्ये तो कर्तव्यास छत्तीसगड येथे असून त्यांची शेती कात्राळ येथे आहे. दि.५ फेब्रुवारी रोजी मयत रेश्मा हिचे सासू, सासरे देवदर्शनासाठी धर्मस्थळा ता.उडपी, कर्नाटक येथे गेले होते.
मयत रेश्मा ही माहेरी जाते म्हणून हट्ट धरुन बसल्याने तिला फिर्यादीने फोन करुन तु उदया वळसंग येथे ये असे सांगितले होते.
तेव्हां मयत ही रागाला गेली होती. दि.६ रोजी सकाळी ८.३० चे सुमारास फिर्यादीचे जावई रोहित पाटील यांनी फोन करुन सांगितले की, रेश्मा हिने कात्राळ शिवारातील शेतात द्राक्षेवर फवारण्याचे विषारी औषध प्राशन केले आहे.
उपचारासाठी चडचण येथे घेवून जात आहे. मात्र उपचारापुर्वीच रस्त्यात ती मयत झाली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
शेततळ्याची माती दंडात टाकण्याच्या कारणावरुन एकास काठीने बेदम मारहाण सहा जणाविरुध्द गुन्हा दाखल
शिरनांदगी येथे शेततळे काढत असताना शेततळ्याच्या बांधाचे खाली दंडात माती टाकू नका या कारणावरुन राजाराम शिंदे याला काठीने जबर मारहाण
करुन शिवीगाळी, दमदाटी केल्याप्रकरणी पांडुरंग मोरे (हिवरगाव), शारदा आनंदा शिंदे (शिरनांदगी), किरण लक्ष्मण शिंदे (पाटखळ) व अन्य अज्ञात सहा जण यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी राजाराम शिंदे व वरील आरोपी यांचे शेतीचा वाद न्यायालयात चालू आहे. दि.२८ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता फिर्यादी यांचे शेतात शिरनांदगी हे करीत आहेत.
येथे शेततळे काढत असताना शेततळ्याच्या बांधाचे खाली दंडात माती टाकू नका असे म्हणून वरील आरोपीने काठीने मारहाण केली. तसेच फिर्यादी यांचे वडील भगवान यांना ढकलून दिले.
फिर्यादीची पत्नी भांडणे सोडविण्यासाठी आली असता तिला शारदा शिंदे हिने हाताने मारहाण केली. तसेच फिर्यादीचा मेव्हणा सुरेश आसबे यालाही आरोपीने काठीने मारहाण केली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
जखमी फिर्यादी हे दवाखान्यात उपचार घेत होते. ते तंदुरुस्त झाल्यानंतर त्यांनी येवून पोलीसा फिर्याद दाखल केली आहे. याचा अधिक तपास पोलीस हवालदार काळे
0 Comments