रिपब्लिकन पँथर सामाजिक संघटनेच्या वतीने माता रमाई यांची जयंती साजरी
सांगोला (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाई यांनी आयुष्यभर दिन दलितांच्या उद्धारासाठी आपले आयुष्य पणाला लावले.
समाजाला वैचारिक अधिष्ठान मिळावे म्हणून त्यांनी समाज उद्धारासाठी केलेले काम नक्कीच आजच्या काळात प्रेरणादायी आहे.
असे मत रिपब्लिकन पँथर सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरज बनसोडे यांनी व्यक्त केले. ते माता रमाई यांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन कार्यक्रमात बोलत होते .
यावेळी शेतकरी महिला सूतगिरणीच्या संचलिका रतन बनसोडे, काँग्रेसच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा मैनाताई बनसोडे,
ज्येष्ठ नेते अरूण अण्णा बनसोडे, चंचल बनसोडे सेनेचे शहर अध्यक्ष तुषार इंगळे आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी सूतगिरणीच्या संचालिका रतन बनसोडे आणि काँग्रेसच्या महिला उपाध्यक्षा मैनाताई बनसोडे सूरज बनसोडे यांच्या हस्ते माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन आले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण अण्णा बनसोडे यांनी केले. तर आभार लकी कांबळे यांनी मानले. सदर प्रतिमापूजन कार्यक्रमास प्रकाश ऊर्फ पप्पू
ऐवळे,चंद्रकांत काटे, सतीश ठोकळे, अण्णा ऐवळे, रमेश गायकवाड, लकी कांबळे, बंटी वाघमारे,
हनी कांबळे, केतन शेळके, अमोल कांबळे, सुरेश पारसे, रघुनाथ ऐवळे गणेश गायकवाड,चंद्रकांत मोरे, चंचल बनसोडे,
पोपट तोरणे, गुणवंत जगधने , देवराज बनसोडे, सुधाकर बनसोडे , गणेश गायकवाड आदि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments