केंद्र सरकारच्या 'हर घर जल नळ'अंतर्गत जलजीवन मिशनमधून ग्रामीण भागातील सोलापूर जिल्ह्यातील तब्बल पावणेसहा लाख कुटुंबांना स्वच्छ व शुद्ध
पाण्यासाठी नळ कनेक्शन दिले जाणार आहे.त्यातून प्रत्येक व्यक्तीला दररोज ५५ लिटर पाणी मिळेल.
सध्या दीडशे गावांमध्ये योजनेची कामे पूर्ण झाली आहेत. या महत्वकांक्षी योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांच्या
डोक्यावरील हंडा कायमचा खाली उतरणार असून दुष्काळातील त्यांची पाण्यासाठीची वणवण देखील थांबणार आहे.
सोलापूर म्हंटले की दुष्काळ, पाणी व चारा टंचाई, पाण्यासाठी वणवण भटकंती असे समिकरणच झाले आहे. पण, विविध अडथळ्यांची शर्यत पार करून केंद्र सरकारच्या जलजीवन मिशनमधून
'हर घर जल नळ'अंतर्गत डिसेंबर २०२४पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये 'जलजीवन'मधून पावणेसहा लाख कुटुंबांना पिण्याच्या पाण्याचे मोफत नळ कनेक्शन दिले जाणार आहेत.
सध्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या पाठपुराव्यातून योजनेतील कामांना गती प्राप्त झाली असून दर आठवड्याला योजनेच्या कामाचा आढावा घेतला जात आहे.
0 Comments