नीलकंठ शिंदे सर यांचा श्रीगोंद्यात सत्कार बांगलादेशातील आंतरराष्ट्रीय युवा शांतता संमेलनात सायकलिंग द्वारे सहभाग
सांगोला (प्रतिनिधी )
भारत -बांगलादेश संवेदना सायकल यात्रा करत बांगलादेश मधील ढाका व नवखालीतील झालेल्या आंतरराष्ट्रीय युवा शांतता संमेलनात भाग घेतलेले
सांगोल्यातील नीलकंठ शिंदे सर यांचा श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर येथे अग्निपंख फाउंडेशनच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
सुरुवातीस श्रीगोंद्यातील अग्निपंख फाउंडेशनच्या कार्यालयात गौरवमूर्ती नीलकंठ शिंदे सर यांना पद्मश्री पोपटराव पवार ,अहमदनगरचे पोलीस
अधीक्षक प्रशांत खैरे, अग्निपंखचे उपाध्यक्ष गणेश डोईफोडे, स्नेहालयाचे चेअरमन डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्या शुभहस्ते सद्भावना सायकल यात्रेचे सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
नीलकंठ शिंदे सर यांनी या कार्यक्रमात संवाद साधताना बांगलादेश सायकल यात्रेतील अंगावर शहारे आणणारे अनुभव सांगितले .तेथील विविध धर्माच्या दंगली ,भाषेच्या मुद्द्यावर जगात
एकमेव स्वातंत्र्य झालेल्या बांगलादेशमधील स्वातंत्र्याचा झालेला लढा ,नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी गांधीजींना दिलेली महात्मा गांधी उपाधी, भारतातील सर्वधर्म संभावाचे सर्वोत्तम प्रतीक असलेले
कलकत्त्यातील समरीन ट्रस्टच्या माध्यमातून मामुन अख्तर करत असलेले नवभारत निर्माणचे कार्य याविषयीची त्यांनी अभ्यासपूर्ण वर्णन केले . प्लासी मधील ऐतिहासिक युद्ध, बांगलादेशमधील हिंदू मंदिर जाळल्या बाबतच्या
बातम्या मागील सत्यता, बांगलादेश मधील दारूबंदी, गुटखाबंदी व व महिला सबलीकरणाचे कार्य रोहिंग्याचे प्रश्न व पार्श्वभूमी भारत- बांगलादेश मैत्रीपूर्ण संबंध यांची अभ्यासपूर्ण माहिती दिली
नौवाखाली तीन महात्मा गांधींजिंच्या पायी यात्रेनंतर इतका त्रास सहन करत सायकलवर प्रवास करत इतक्या मोठ्या संख्येने नौवाखालीत येण्याचा इतिहास घडला.
याचे अनेक संदर्भ शिंदे सरांनी सांगितले . या पुढील काळात देखील शांतता व सद्भाभावनेच्या करिता पुढील सायकल यात्रा पाकिस्तानमधील पेशावर ,लाहोर ,
इस्लामाबाद या ठिकाणी आयोजित केले असल्याचे सांगितले . पुढील काळात पाकिस्तान येथे आयोजित केलेल्या सद्भावना सायकल सहभागी होणार असल्याचे नीलकंठ शिंदे सर यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
सदरच्या सन्मानपत्र गौरवमूर्ती यांच्या सत्काराचे आयोजन श्रीगोंदा तालुका सायकल असोसिएशन ,स्नेहालय परिवार अहमदनगर ,अग्निपंख फाउंडेशन या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेला होता .
चौकट:- भारत मातेचे आदर्श सायकल पट्टू म्हणून हे सन्मानपत्र बहाल करताना विशेष आनंद होत आहे,
निळकंठ शिंदे सरांमुळे बांगलादेशातील राजकीय व सामाजिक परिस्थितीचा वस्तुनिष्ठ इतिहास माहिती झाला हि काळाची गरज आहे नीलकंठ शिंदेंच्या या सायकल प्रवासामुळे येथील जन जीवन ज्ञात होण्यास मदत झाली
या भागातील पंचक्रोशीचे भूषण अभ्यासू व्यक्तिमत्व आहे याचा आम्हा भारतीयांना अभिमान आहे. भविष्यात आपण सामाजिक जाणीवेतुन हाती घेतलेले कार्य अधिक क्षमतेने करत राहावे त्यासाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.
श्री प्रशांत खैरे, अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर



0 Comments