google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 हुबळी-पंढरपूर-कलबुर्गी-हुबळी व दादर-पंढरपूर-सातारा ही रेल्वे दररोज सुरू करून सांगोला स्टेशन येथे थांबा द्या रेल्वे प्रवाशांच्या मागणीकडे खासदार व आमदार यांनी लक्ष घालावे

Breaking News

हुबळी-पंढरपूर-कलबुर्गी-हुबळी व दादर-पंढरपूर-सातारा ही रेल्वे दररोज सुरू करून सांगोला स्टेशन येथे थांबा द्या रेल्वे प्रवाशांच्या मागणीकडे खासदार व आमदार यांनी लक्ष घालावे

हुबळी-पंढरपूर-कलबुर्गी-हुबळी व दादर-पंढरपूर-सातारा ही रेल्वे दररोज सुरू करून सांगोला


स्टेशन येथे थांबा द्या रेल्वे प्रवाशांच्या मागणीकडे खासदार व आमदार यांनी लक्ष घालावे

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी): कोल्हापूर - कलबुर्गी- कोल्हापूर एक्सप्रेस दररोज सकाळी सोडण्यात यावी व सांगोला येथे थांबा मिळावा. तसेच मिरज - कुर्डूवाडी - दादर - पंढरपूर - सातारा ही रेल्वे दररोज सुरू करावी. प्रवासी, 

भाविकभक्त यांच्या सेवेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील देवस्थान श्री. विठ्ठ्लाचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक भक्तांची गर्दी होत आहे. त्याअनुषंगाने मा. रेल्वे राज्यमंत्री. नाम. रावसाहेब दानवे 

यांनी पश्चिम महाराष्ट्रतील पंढरपूर तीर्थक्षेत्रासाठी हुबळी-पंढरपूर-कलबुर्गी तसेच कोल्हापूर-कलबुर्गी- कोल्हापूर, रेल्वेला सांगोला रेल्वे स्टेशन येथे थांबा देणेसाठी आदेश द्यावा. 

भाविक भक्तांची अनेक वेळा उपेक्षा होत आहे. गाणगापूरहून अक्कलकोट कलबुर्गी रेल्वे गाडी सोलापूर तसेच मोहोळ, पंढरपूर, कुर्डूवाडी, पंढरपूर, सांगोला, जतरोड,

 डोंगरगांव, ढालगाव, कवठेमहंकाळ, सलगरे, अरग, मिरज याठिकाणी तसेच कोल्हापूरला जाण्यायेण्यासाठी सकाळची ८.३० ते १०.३० पर्यंत दोन वेळा रेल्वे सुरू करावी. व दुपारी ०३.०० ते ५.०० या वेळेत सुरू करावी.

 हुबळी-पंढरपूर-कलबुर्गी ही सकाळची व दुपारची तसेच दादर-पंढरपूर- सातारा ही रेल्वे सुरू करण्यासाठी सांगोला रेल्वे स्टेशन येथील प्रवाशी भाविक भक्तांनी अनेकवेळा मागणी केली आहे.

 मा. रेल्वे राज्यमंत्री नाम. रावसाहेब दानवे यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवावा खासदार व आमदार यांनीही लक्ष घालावे अशी प्रवासी वर्गातून मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments