google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज! राज्यात आणखी एक राजकीय भूकंप?

Breaking News

ब्रेकिंग न्यूज! राज्यात आणखी एक राजकीय भूकंप?

 ब्रेकिंग न्यूज! राज्यात आणखी एक राजकीय भूकंप?महाराष्ट्र काँग्रेसमध्ये 'भूकंप';


अशोक चव्हाण यांचा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा, नाना पटोले तातडीने दिल्ली दौऱ्यावर

काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचादेखील राजीनामा दिल्याची चर्चा सुरु झाली आहे. 

दरम्यान चव्हाण यांच्यासोबत ११ आमदारदेखील भाजपामध्ये जाणार असल्याची माहिती मिळत आहे. चव्हाण यांना भाजपाकडून मंत्रिपदाची ऑफर असल्याचे देखील कळते. 

चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याचे संकेत मिळत आहेत. काँग्रेसचे राज्यातील मोठे नेते, 

माजी मुख्यमंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. चव्हाण यांनी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतल्यानंतर या बातम्या समोर आल्या आहेत.

 चव्हाण यांनी नार्वेकर यांची भेट घेऊन आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे. चव्हाण अनेक दिवसांपासून पक्षात नाराज होते. 

 चव्हाण भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. मात्र, आता नार्वेकर यांच्या भेटीनंतर या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. या सर्व घडामोडींमध्ये अशोक चव्हाण मात्र नॉट रिचेबल आहेत.महाराष्ट्र काँग्रेसमध्ये 'भूकंप'; अशोक चव्हाण यांचा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा, नाना पटोले तातडीने दिल्ली दौऱ्यावर

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण  यांनी राजीनामा दिला असल्याची चर्चा सुरू असताना 

दुसरीकडे काँग्रेसमध्येही हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  हे दिल्लीला रवाना झाल्याचे वृत्त आहे. 

अशोक चव्हाण यांच्यासोबत काही आमदारही भाजपात प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे नाना पटोले यांचा दौरा महत्त्वाचा असल्याचे म्हटले जात आहे.

Post a Comment

0 Comments