google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक...सांगोला तालुक्यातील दुसरी घटना गळफास घेऊन सांगोल्यात विवाहितेने केली आत्महत्या

Breaking News

खळबळजनक...सांगोला तालुक्यातील दुसरी घटना गळफास घेऊन सांगोल्यात विवाहितेने केली आत्महत्या

 खळबळजनक...सांगोला तालुक्यातील दुसरी घटना गळफास घेऊन सांगोल्यात विवाहितेने केली आत्महत्या


सांगोला : घरात पत्र्याच्या लोखंडी अँगलला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन विवाहितेने आत्महत्या केली. ही घटना सोमवार, १२ रोजी दुपारी १२ च्या सुमारास वाकी घेरडी (ता. सांगोला) येथे घडली.

आशा शशिकांत जगधने (वय २५) असे मृत महिलेचे नाव असून याबाबत, सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी पोलिसात खबर दिली आहे.

पती शशिकांत जगधने यांनी पत्नी आशाला मोबाईलवरून संपर्क साधला असता तिने प्रतिसाद दिला नाही. पतीने नातेवाईकांस घरी पाठवले असता

 अशा तिने घरातील पत्र्याच्या लोखंडी अँगलला गळफास घेतल्याचे दिसले. त्यांनी या घटनेची माहिती पती शशिकांत यांना दिली. नातेवाईकांनी तिला खाली उतरून तात्काळ सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले 

असता तिचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. तिच्या आत्महत्येमागील कारणाचा पोलिस शोध घेत आहेत. तपास पोलीस कॉन्स्टेबल बोराटे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments