भाजपाच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडली –
आमदार प्रणिती शिंदे यांचा गौप्यस्फ़ोट
सोलापूर :- काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठठी दिली आहे. त्यानंतर सोलापूरच्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी यावर भाष्य केलं आहे.
यावर बोलताना मी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे आमदार प्रणिती शिंदे यांनी स्पष्ट केलं. भाजपने ईडीची भीती दाखवल्याने अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे.
वारंवार छापा आणि प्रेशर टाकून त्यांना ब्लॅकमेल करण्यात आलं. म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. काँग्रेससाठी दुर्दैवी गोष्ट आहे, भारदस्त नेता होते. पण हे भाजपचे तंत्रच आहे, प्रेशर आणि ब्लॅकमेल केलं जात आहे.
हताश होऊन निर्णय घेतला : शिंदे आमच्या राजीनामा बाबतीत बोलल्या जाणाऱ्या गोष्टी या सगळ्या अफवा आहेत, मी आणि साहेबांनी (सुशील कुमार शिंदे) याबाबतीत स्पष्टीकरण दिलेलं आहे.
अशोक चव्हाण यांनी सध्या काँग्रेसचा राजीनामा दिलेला आहे. ते पुढे काय करणार हे आता त्यांनी सांगितलेलं नाही. अशोक चव्हाण यांचे वडील मुख्यमंत्री होते.
त्यांच्या पत्नी आमदार होत्या. त्यांच्याशी देखील माझं बोलणं झालं आहे. त्यांच्यात असलेलं स्ट्रेस लेव्हल आणि ज्या पद्धतीने भाजपकडून माइंड गेम खेळलं गेलं ते मी रेकॉर्डवर आणू शकतं नाही.
पण अतिशय हताश होऊन त्यांनी हा निर्णय घेतला आहे. अजूनही काँग्रेसमधील अनेक नेत्यांना त्रास देणे सुरूच आहे, हे असलं राजकारण देशात पहिल्यांदाच होत असल्याची टीका प्रणिती शिंदे यांनी केली.


0 Comments