ब्रेकिंग! भाजपमध्ये जाण्याचा निर्णय अद्याप केला नाही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला.
त्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत वेगवेगळी चर्चा सुरू झाली आहे.
या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. मुंबईत ते आज पत्रकारांशी बोलत होते. काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय का घेतला या प्रश्नावर थेट काही बोलण्याचे चव्हाण यांनी टाळले.
प्रत्येक निर्णयामागे कारण असलेच पाहिजे, असे नाही आणि प्रत्येक कारण जाहीरपणे सांगितलेच पाहिजे, असे नाही. जोपर्यंत मी काँग्रेसमध्ये होतो,
तोपर्यंत पक्षात प्रामाणिकपणे काम केले. आता काही तरी वेगळा पर्याय चाचपून पाहावा असे वाटल्याने मी बाजूला होत आहे,
असे ते म्हणाले. भाजपाकडून राज्यसभेवर पाठवले जाणार असल्याची चर्चेवरही चव्हाण यांनी मत मांडले.
मी कुठल्याही पक्षाच्या संपर्कात नाही. कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. मला निर्णय घेण्यासाठी वेळ हवा आहे. येत्या दोन दिवसांत माझा निर्णय जाहीर करेन, असे चव्हाण यांनी सांगितले.


0 Comments