खळबळजनक घटना...पाचगणीत
डान्सबारवर छापा टाकून सोलापूर जिल्ह्यातील
24 खत बी-बियाणे विक्रेते ताब्यात; वाकी शिवणे ता.सांगोल्यातील एकजनाचा समावेश डॉक्टर, व्यापारी सापडले 33 जणांवर गुन्हा
जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या पाचगणीतील खिंगर गावच्या हद्दीत टेन्ट हाऊस रिसॉर्टवर बारबाला नाचवल्याप्रकरणी टेन्टमालक,
बारबालांसह खते बी-बियाणे विक्रेते व डिलर 25 जण अशा 37 जणांवर सातारा पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, डॉ. विजय दिघे यांच्या मालकीचे पाचगणीत खिंगर गावच्या हद्दीत टेन्ट हाऊस असून, येथील एका हॉलमध्ये रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती सातारा
पोलिस अधीक्षक समीर शेख व अतिरिक्त पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांना मिळाली. या माहितीवरून सातार्यावरून पोलिसांचे एक विशेष पथक पाचगणी खिंगरकडे रवाना करण्यात आले.
पाचगणी खिंगर टेन्ट हाऊस रिसॉर्टवर बारबालांची ‘छमछम’ सुरू असतानाच सातारा पोलिसांनी तेथे छापा टाकला. यावेळी तेथे एका हॉलमध्ये सोलापूर जिल्ह्यातील खत विक्रेते-डिलर बारबालांसमवेत डान्स करत
असल्याचे पोलिसांना आढळले. सातारा पोलिसांनी त्यांना रंगेहात ताब्यात घेतले. त्या ठिकाणी ब्रँडेड कंपनीच्या मोबाईलसह आलिशान कार जप्त करण्यात आल्या.
रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पाचगणी खिंगर येथील टेन्ट हाऊस रिसॉर्टवर ही मद्यधुंद रेव्हपार्टी सुरु होती.
तळमजल्यावर विदेशी कंपनीच्या दारूच्या बाटल्या व डान्सबारसारखी बैठक व्यवस्थाही पोलिसांच्या निदर्शनास आली.
पोलिसांना पाहताच काही बारबालांसह पाच ते सहाजण तेथून आलिशान वाहने सोडून तेथून पसार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
घटनास्थळी सोलापूर जिल्ह्यातील खत व्यावसायिक व खत कंपन्यांत काम करणारे काही एजंट व बारबाला मिळून एकूण 37
जणांची सातारा पोलिसांनी चौकशी केली. अनेक जण दारूच्या नशेत नर्तिकांसमोर झिंगत असतानाच पोलिसांना रंगेहात सापडले.
गुन्हा दाखल झालेले इसम याप्रमाणे-
भैरवनाथ चंद्रभान चवरे (पेनुर ता. मोहोळ जिल्हा सोलापूर), डॉ. विजय रघुनाथ दिघे (रा. आंबेघर ता. जावली) पाचगणी टेन्टहाऊस रिसॉर्ट मालक,
गिरीश एकनाथ दिघे (रा. आंबेघर ता. जावली) मॅनेजर, दत्तात्रय काशिनाथ भोसले (खवणी ता. मोहोळ),नवनाथ अरुण देवकते (रा. धारुणी ता. माळशिरस),
गणेश हनुमंत करणावर (मोहोळ ता. सोलापूर), रवी भैस खानट (रा. खानट वस्ती करमाळा), बाबासाहेब बाबुराव सलगर (निंबर्गी सोलापूर),
सदानंद विठ्ठल देवकते (सादेपूर सोलापूर), अण्णा नाना पडळकर ( रा. आटपाडी जि. सांगली),प्रदीप प्रभू खांडेकर (शेंदुगेवाडी भाळवणी पंढरपूर), कैलास रामचंद्र गुर्वे (साळवेश्वर ता. मोहोळ),
विजय श्रीमंत नागणे (कोंढारकी मुंढेवाडी जि. सोलापूर), महेश दत्तात्रय खरात (रा. सोनके पंढरपूर), नंदकुमार श्रीरंग शिंदे (मोहोळ जि. सोलापूर),
सुरज दिगंबर कुंभार (वाकी शिवणे ता.सांगोला. जि. सोलापूर) सचिन सुधाकर बावकर (भैरवनगर पुणे), गणेश शिवाजी सलगर, गणेश नामदेव पुजारी (रा. सोलापूर) व चार अनोळखी
याबाबतची फिर्याद कॉन्स्टेबल उमेश रामचंद्र लोखंडे यांनी पाचगणी पोलिस ठाण्यात दिली. याप्रकरणी 12 बारबाला व खत विक्रेते-डिलर तसेच
पाचगणी टेन्ट हाऊसचे मालक डॉ. विजय दिघे तसेच मॅनेजरसह एकूण 37 जणांवर पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान दोन महिन्यांपूर्वी पाचगणी कासवंड येथील स्प्रिंग व्हॅली रिसॉर्टवर अशीच कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी पाच डॉक्टरवर कारवाई झाली होती.
सातारा जिल्हा पोलिस अधिक्षक समीर शेख व अतिरिक्त पोलिस अधिक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखालील ही सर्वात मोठी कारवाई आहे.



0 Comments