सांगोला लेबर फेडरेशनच्या निवडणुकीत शेकापचे बाबासाहेब करांडे यांचा विजय
(शब्दरेखा एक्सप्रेस संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी):-संपूर्ण सांगोला तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या आणि शेतकरी कामगार पक्षाच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या
लेबर फेडरेशनच्या निवडणुकीत शेकापचे उमेदवार स्व. गणपतराव देशमुख यांचे अत्यंत विश्वासू असलेल्या बाबासाहेब कारंडे यांनी एकतर्फी विजय मिळविला.
सांगोला तालुक्यातील एकूण ३३ मतांपैकी सर्वच्या सर्व मते पोल झाली. यापैकी तब्बल २३ मते बाबासाहेब कारंडे यांना मिळाली.
संपूर्ण तालुक्यात चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेल्या या बहुचर्चित निवडणुकीत शेकापचे जेष्ठ नेते बाबासाहेब कारंडे यांनी मोठ्या फरकाने बाजी मारली.
मी शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता असून मी शेतकरी कामगार पक्षाचे यापुढेही काम करणार आहे. मी पक्ष सोडणार आहे
अशा अफवा पसरविल्या जात आहेत. या अफवेवर कोणीही विश्वास ठेवू नये. भाई. बाबासाहेब करांडे, ज्येष्ठ नेते, शेकाप



0 Comments