google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त "होम मिनिस्टर" स्पर्धेचे आयोजन

Breaking News

सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त "होम मिनिस्टर" स्पर्धेचे आयोजन

सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या


वाढदिवसानिमित्त "होम मिनिस्टर" स्पर्धेचे आयोजन

सांगोला /शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क : कार्यसम्राट मा.आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जवळा परिसरातील महिलांसाठी शनिवार दि.६ जानेवारी रोजी 

श्री नारायणदेव मंदिर जवळा ता.सांगोला येथे भव्य "होम मिनिस्टर" स्पर्धा जानेवारी 2024 स्वस्ती नेचुरा प्रॉडक्ट्स, यशजीवन हॉस्पिटल व बचत गट यांच्यातर्फे भव्य "होम मिनिस्टर" स्पर्धा आयोजित करण्यात आल्या 

असून स्पर्धेचे उद्घाटन रेखाताई शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते व कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ शिलाकाकी झपके असून सौ शोभा कदम लोकनियुक्त सरपंच यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

      जवळा ता.सांगोला परिसरातील महिलांसाठी आपण साऱ्यांजणी मिळून खेळ खेळूया पैठणी, "होम मिनिस्टर" या खेळाची कोण होणार विजेती यासाठी पुढील प्रमाणे बक्षीस आयोजित केलं आहे.

प्रथम बक्षीस पैठणी व सोन्याची नथ, द्वितीय पैठणी व चांदीचा करंडा, तृतीय पैठणी व चांदीचा छल्ला उत्तेजनार्थ पैठणी व चांदीची जोडवी, 

तसेच लकी ड्रॉ पद्धतीने १० विशेष भरघोस बक्षीसे दिली जाणार आहेत. याशिवाय या स्पर्धेमध्ये सहभागी महिलांसाठी आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.

 या स्पर्धा पार पडण्यासाठी सचिन ज्वेलर्स व सौ आरती घाडगे यांचे सह सौ.अश्विनी अनिल खटकाळे सौ विद्या विठ्ठल बागल यांचे सौजन्य लाभले आहे.स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी 

सौ मनीषा मोरे ७०८३५३०८५५, संकल्पना कुलकर्णी ९५२९३६५५१५, श्रीमती सुनिता शिंदे ८९९९१५१२९४, सौ स्मिता पंडित ८९७५४६३९७५, सौ जयश्री निगडे ७०२८४४४०३९ यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या अँकर अनुपमा गुळमिरे असणार आहेत.

तर या सपर्धेच्या आयोजक सरपंच सौ सुषमा घुले डॉ. सौ नेहा पाटील,सौ माधुरी गायकवाड या आहेत. तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments