google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यात कमी मुल्यांकन दाखवून शासनास नजराण्यापोटी मिळणाऱ्या लाखो रुपयांचे नुकसान ; कर्तव्यदक्ष तहसीलदार दुय्यम निबंधकावर केव्हा कारवाई करणार ?

Breaking News

सांगोला तालुक्यात कमी मुल्यांकन दाखवून शासनास नजराण्यापोटी मिळणाऱ्या लाखो रुपयांचे नुकसान ; कर्तव्यदक्ष तहसीलदार दुय्यम निबंधकावर केव्हा कारवाई करणार ?

सांगोला तालुक्यात कमी मुल्यांकन दाखवून शासनास नजराण्यापोटी मिळणाऱ्या लाखो रुपयांचे नुकसान ;


कर्तव्यदक्ष तहसीलदार दुय्यम निबंधकावर केव्हा कारवाई करणार ?

सांगोला विशेष प्रतिनिधी ; सांगोला शहरातील  कुलकर्णी वतन जमिनीवरील असणारा  भोगवटदार  वर्ग -२  शेरा कमी करून भोगवटदार  वर्ग -१ करण्यासाठी 

तहसिलदार, सांगोला यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांच्याकडे लेखी पत्र व्यवहार करून सदर कुलकर्णी वतन जमिनीचे मूल्यांकन दाखला मागणी केला होता. 

सदर पत्रानुसार दुय्यम निबंधक सांगोला यांनी तहसीलदार सांगोला यांना सदर जमिनीचे प्रती चौ.मी.५६०/- प्रमाणे सन २०२३ चे ४३ लाख ६८ हजार रुपये एवढे मुल्यांकन दाखवले आहे. 

वास्तविक पाहता सदर जमिनीचे १ कोटी ३१ लाख ४ हजार रुपये होत असताना दुय्यम निबंधक सांगोला यांनी कमी मूल्यांकन दाखवून शासनास 

नजरान्यापोटी मिळणाऱ्या ४३ लाख ६८ हजार रुपयांचे नुकसान केले आहे. सदर कुलकर्णी वतन जमिनीचे सन २०१६ ते २०२१ या कालावधीत झालेल्या

 सर्व खरेदी विक्री व्यवहारासाठी तत्कालीन दुय्यम निबंधक सांगोला यांनी प्र ती चौ.मी. १६८०/- प्रमाणे दर लावून शेकडो दस्त नोंदणी केले आहेत. व त्याप्रमाणे मुद्रांक शुल्क भरून घेतला आहे .

जर सन २०१६ ते २०२१ या कालावधीत प्रती चौ.मी. १६८०/- रुपये दर असेल तर सन २०२३ मध्ये प्रती चौ.मी.५६० /- (फक्त) कसा असू शकतो. 

असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.सन २०२३ मध्ये सदर जागेचे बाजार मूल्य प्रती चौ.मी. ५६०/- रुपये एवढे असेल

 तर सन २०१६ ते २०२१ या जादा मुल्यांकन दाखवून नागरिकांची फसवणूक करून प्रमाणापेक्षा जास्त भरलेल्या रकमा शासन परत करणार आहे काय ? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. 

त्यामुळे सांगोल्याचे नवनिर्वाचित कर्तव्यदक्ष तहसीलदार संतोषजी कणसे साहेब यांनी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Post a Comment

0 Comments