सांगोला तालुक्यातील लोटेवाडी गावामध्ये मुख्यमंत्री शिंदे गटाचे आमदार शहाजी (बापू) पाटील यांचे
गटाचे श्री.नामदेव शामराव लवटे हे सरपंच पदी विराजमान शिवसेनेचा व खांडेकर गटाचा सरपंच...!
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
लोटेवाडी प्रतिनिधी:- सांगोला तालुक्यातील लोटेवाडी गावामध्ये मा.सरपंच विजय उत्तम खांडेकर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी आज दि.१७.०१.२०२४ रोजी मतदान झाले.
त्या झालेल्या अटीतटीच्या मतदानाच्या निकालांमध्ये सरपंचपदी मुख्यमंत्री शिंदे गटाचे आमदार शहाजी (बापू) पाटील यांचे गटाचे श्री.नामदेव शामराव लवटे हे सरपंच पदी विराजमान झाले.
सदरच्या मतदानावेळी शिवसेनेला उत्तम खांडेकर गटाने पाठिंबा दिल्यामुळे शिवसेना व खांडेकर गट ७ मते व शेकाप पक्षाला ४ मते असे मतदान झाले.
उत्तम खांडेकर,सागर लवटे, दादासाहेब लवटे यांच्या एकत्र येण्यामुळे हा मोठा विजय शिवसेनेला प्राप्त झाला आहे.
लोटेवाडी गावामध्ये फटाक्याची आतषबाजी आणि जंगी मिरुवणुक काढण्यात आली.आ.शहाजी (बापू) पाटील यांच्या कामावर विश्र्वास ठेवत
गावामधील मतभेद विसरून दोन्ही गट एकत्र आल्याचे सर्वसामान्य जनतेमधून बोलले जात आहे.निवडणूक अधिकारी पी.एस.जाधव व तलाठी कडलासकर,ग्रामसेवक समाधान आदाटे यांनी सदर सरपंच निवडीची चे कामकाज पाहिले
.या ठिकाणी सर्व लोटेवाडी गावचे ग्रामपंचायत सर्व सदस्य व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
0 Comments