धक्कादायक प्रकार...गुटख्याच्या पुडीने घात केला
मित्रानेच त्याचा चाकूने भोसकून खून
तरुणांमध्ये व्यसनाधीनता व त्यातून होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. जालन्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान गुटख्याच्या पुडीसाठी झालेल्या वादातून एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. मित्रानेच त्याचा चाकूने भोसकून खून केला. जालना शहराच्या जवळच असलेल्या पीर पिंपळगाव शिवारात ही घटना घडली.
दिलीप हरिभाऊ कोल्हे (वय २३ वर्ष) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अरविंद लक्ष्मण शेळके असे आरोपीचे नाव आहे. घटनेनंतर आरोपी फरार असून पोलीस पथक त्यांच्या मागावर आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गुटख्याची पुडीवरून दोघांमध्ये प्रचंड वादावादी झाली. हा वाद इतका वाढला की, याचे पर्यावसान हाणामारीत झाले. त्यानंतर अरविंदने दिलीपच्या छातीत चाकू खुपसला.
दिलीप रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपीने साथीदारांसह पळ काढला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच चंदनझीरा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दिलीपचा जागीच मृत्यू झाला होता
0 Comments