google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी..सांगोला तहसीलदार पथकाच्या गाडीला वाळूमाफियाच्या टेम्पोची धडक शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

Breaking News

मोठी बातमी..सांगोला तहसीलदार पथकाच्या गाडीला वाळूमाफियाच्या टेम्पोची धडक शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

मोठी बातमी..सांगोला तहसीलदार पथकाच्या गाडीला वाळू माफियाच्या टेम्पोची धडक


शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

सांगोला : वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा पाठलाग करत असताना महसूल पथकाचे शासकीय वाहन ओव्हरटेक करून पुढे जाताना त्याच टेम्पोने

 पाठीमागून वाहनास जोराची धडक दिली. वाळूमाफियांनी एवढ्यावरच न थांबता पथकास शिवीगाळ, दमदाटी करून धक्काबुक्की केली

 व 'तुम्हाला बघून घेतो.' म्हणून तेथून दोघांनी धूम ठोकली. ही घटना ५ जानेवारी रोजी मध्यरात्री एकच्या सुमारास चिंचोली ते सांगोला जाणाऱ्या बायपास रोडवर घडली.

याबाबत, शासकीय वाहनचालक दिलीप चंदू काळे (रा. सांगोला) यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी अनोळखी 

टेम्पोचालकासह एकजण व सोनू जानकर (रा. जानकर वस्ती, सांगोला) याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

तहसीलदार संतोष कणसे यांनागोपनीयरीत्या सांगोला कोपटे वस्ती येथे चोरीची वाळू वाहतूक करून आणणार असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे मंडल अधिकारी व्ही. बी. जाधव, तलाठी बी. पी. डांगे, 

तलाठी ए. टी. लिगाडे, वाहनचालक दिलीप काळे असे मिळून ५ जानेवारी रोजी रात्री ११ च्या सुमारास एमएच ४५ एएल ८१७१ या शासकीय वाहनाने कोपटेवस्ती येथे जात असताना 

वाळू वाहतुकीच्या संशयावरून समोरून येणाऱ्या टेम्पोस हात करून थांबवण्यास सांगितले असता त्याने त्यांच्या जवळ येऊनवाहन थांबवले व पुन्हा न थांबवता तसेच वाहन पुढे घेऊन गेला म्हणून त्या वाहनाचा पाठलाग करताना

 वाहनचालकाने त्याच्या गाडीतील वाळू डम्पिंग करून खाली रस्त्यावर सांडत निघून गेला. तो सांगोला ते चिंचोली जाणाऱ्या बायपास रोडवरून जाताना पुन्हा पथकाने त्याला गाडी थांबवण्याचा हाताने इशारा केला

 असता त्याने त्याच्या ताब्यातील गाडीने शासकीय वाहनास पाठीमागून येऊन धडक दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

चौकट

'गाडी अडवणारे कोण?' म्हणत केली शिवीगाळ

दुचाकीवरून सोनू जानकर यांनी त्या ठिकाणी येऊन तुम्ही आमची गाडी आडवणारे कोण, तुमचा काय संबंध?' 

असे म्हणून पथकास धक्काबुक्की करून तुम्हाला बघून घेतो असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी करून 

अंधाराचा फायदा घेऊन टेम्पोच्या चालकास 'तू गाडी पुढे घेऊन जा' असे म्हणून गाडीतील उतरलेल्या अनोळखी एकासह दोघेजण मिळून तेथून निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments