google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 हिंदू जनजागृती समिती आणि श्री अंबिका देवस्थान समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने मंदिर स्वच्छता उपक्रम संपन्न

Breaking News

हिंदू जनजागृती समिती आणि श्री अंबिका देवस्थान समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने मंदिर स्वच्छता उपक्रम संपन्न

 हिंदू जनजागृती समिती आणि श्री अंबिका देवस्थान समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने मंदिर स्वच्छता उपक्रम संपन्न


 (शब्दरेखा  एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२) 


सांगोला -  येथील श्री अंबिका देवी मंदिराची हिंदू जनजागृती समिती आणि श्री अंबिका  देवस्थान समितीच्या वतीने  बुधवार, 17 जानेवारी या

 दिवशी दुपारी 3 ते 6 या कालावधीमध्ये मंदिर स्वच्छता करण्यात आली. यावेळी मंदिराचा गाभारा व आसपासचा परिसर याची झाडून, पाणी मारून, पुसून स्वच्छता करण्यात आली.

 यावेळी सामूहिक प्रार्थना व प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच श्रीराम जय राम जय जय राम हा नामजप करण्यात आला. यावेळी जे श्री अंबिकादेवी भक्त या उपक्रमात सहभागी झाले होते, 

त्यांच्यामध्ये खूप उत्साह जाणवत होता. येत्या 22 जानेवारीला अयोध्या येथे प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. याच आनंददायी घटनेचे औचित्त साधून मंदिर स्वच्छता करण्यात आली. मंदिराचे पुजारी मयुरेश गुरव, 

सोमा गुरव, साईराज पारसे, सर्वेश गुरव, बालाजी भद्रशेट्टी , अनुराग टिंगरे, अक्षय गायकवाड, शुभम जुंदळे, रुद्रेश स्वामी, निरंजन नवाळे, आशिष कोकरे, सोहम गायकवाड, बालाजी माळी, चैतन्य गुरव, रोहित पवार, प्रवीण जानकर यांसह

हिंदू जनजागृती समितीच्या वतीने नवनाथ कावळे, सौ. स्नेहा कावळे, कुमारी वैष्णवी तोडकरी, श्रेयस तोडकरी, सौ. विजया तोडकरी, विकास गावडे, अजय तेली, प्रशांत राजमाने, अशोक बंडगर, ऋषी अनुसे, संतोष पाटणे, सौ. शुभांगी पाटणे यांसह पुष्कळ संख्येने देविभक्त सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments