google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक प्रकार...वयाने मोठी पत्नी, मांढरदेवीला नेलं अन् बेपत्ता झाली, अडीच महिन्यांनी फुटलं बिंग !परतला. तेथे पोलिसांना चकवा दिला पण अखेर सगळेच बिंग फुटले !

Breaking News

धक्कादायक प्रकार...वयाने मोठी पत्नी, मांढरदेवीला नेलं अन् बेपत्ता झाली, अडीच महिन्यांनी फुटलं बिंग !परतला. तेथे पोलिसांना चकवा दिला पण अखेर सगळेच बिंग फुटले !

धक्कादायक प्रकार...वयाने मोठी पत्नी, मांढरदेवीला नेलं अन् बेपत्ता झाली, अडीच महिन्यांनी फुटलं बिंग !परतला.


तेथे पोलिसांना चकवा दिला पण अखेर सगळेच बिंग फुटले !

 वयाने मोठी असलेल्या पत्नीला देवदर्शन करण्याच्या निमित्ताने बोलावून घेतले आणि पत्नीसोबत मोठे कांड करून पोलिसांची दिशाभूल त्याने केली पण हे सगळे प्रकरण उघडकीस आले आणि पोलिसांनी त्याला बेड्या देखील ठोकल्या.

गुन्हेगार गुन्हे करताना आपण खूप हुशार आहोत आणि पोलिसांना सहजपणे गुंगारा देवू शकतो असा त्याचा समज असतो, अर्थत तो गैरसमज आहे हे त्याच्या नंतर लक्षात येते पण तो पर्यंत त्याच्या हातातून सगळे काही निसटलेले असते.

 गुन्हेगार कितीही हुशार असला तरी त्याने केलेल्या गुन्ह्याचा छडा पोलीस लावतच असतात. क्वचित प्रसंगी विलंब लागतो पण पोलिसांचे हात गुन्हेगाराच्या कॉलर पर्यंत पोहोचत असतात

. असाच एक प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. गुन्हेगाराने गुन्हा करण्याचे आणि तो लपविण्याचे पुरते नियोजन केले

होते, पण त्याचा हा फंडा काही चालला नाही आणि त्याला अखेर पोलिसांच्या बेड्या पडल्याच ! तब्बल अडीच महिने त्याने पोलिसांना गुंगारा देण्यात यश मिळवले पण त्यानंतर मात्र त्याचे सगळे बिंग फुटले. 

हवेली तालक्यातील फुलगाव येथील, (मूळ राहणार अंजिनाईक, जि.यवतमाळ) अमोलासिंग जाधव (वय२६) याने आपल्या पत्नीला मारण्याचा मोठा कट रचला. आपली पत्नी बेपत्ता झाली असल्याची खबर त्याने पोलिसांना दिली

 आणि पोलिससह तो देखील पत्नीचा शोध घेत फिरू लागला. तक्रार दिल्याच्या दिवशी तो कामावर असल्याचा पुरावा देखील त्याने आधीच तयार करून ठेवला होता. शिवाय १५ दिवसांपासून मोबाईल बंद असल्याचे सांगून स्वतःवर संशय येऊ न देण्याची खबरदारी घेतली. 

कट रचल्यापासूनच तो आपला काही पुरावा मिळणार नाही तसेच पोलिसांची दिशाभूल करता यावी यासाठी त्याने सारे हातखंडे वापरले होते. 

पोलिसात तक्रार दिल्यानंतर तो स्वतः पत्नीचा शोध घेत असल्याचे पोलिसांच्या नजरेत आणत राहिला पण त्याचा हा डाव फसला गेला.

अमोलसिंगचे लग्न ललिता जाधव यांच्याशी झालेले होते आणि अमोलची पत्नी त्याच्यापेक्षा वयाने मोठी होती.बारा वर्षाने मोठी असलेल्या ललितासोबत त्याने आई वडिलांच्या इच्छेखातर लग्न केले होते पण मनातून त्याला हे लग्न मान्य नव्हते. 

त्यामुळे त्याला घटस्फोट हवा होता. घटस्फोट द्यायला ललिता मात्र तयार नव्हती. अखेर यातून मार्ग कसा काढायचा हा प्रश्न अमोलसिंग समोर होता. शेवटी त्याने थंड डोक्याने कट रचला आणि देवदर्शन करण्याच्या बहाण्याने कारस्थान केले. 

देवदर्शन करण्याच्या बहाण्याने त्याने पत्नी ललिता हिला फिरायला नेले. दोघे मांढरदेवी येथे पोहोचले. मांढरदेवी घाटात त्याने पत्नीला ढकलून दिले. शांतपणे हे सगळे करून तो तितक्याच शांतपणेगावी परतला. एवढी मोठी घटना घडवून देखील तो शांत होता. 

त्याच शांतपणे तो गावी परतताच थेट पोलीस ठाण्यात पोहोचला. आपली पत्नी बेपत्ता झाली असल्याची बतावणी करीत त्याने पोलिसात तशी तक्रार देखील दिली. 

जवळपास अडीच महिने पोलीस बेपत्ता ललिताचा शोध घेत राहिले. या दरम्यान आपणही पत्नीचा शोध घेत असल्याचे अमोलसिंग पोलिसांना भासवत राहिला. ललिता कुठेच सापडत नव्हती.

अडीच महिने झाले तरी ललिता सापडत नसल्यामुळे पोलिसांनी आपल्या तपासाची दिशा फिरवली. पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार देणाऱ्या अमोलासिंग याचीच चौकशी पोलिसांनी सुरु केली. त्यानंतर मात्र अमोलसिंग याची बोबडी वळायला सुरुवात झाली.

 पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे देता देता त्याला घाम सुटू लागला आणि पोलिसांचा संशय अधिक बळावला. आणि अखेर त्याला आपल्या याआणि अखेर त्याला आपल्या या गुन्ह्याची कबुली द्यावी लागली. आपल्या पत्नीचा खून कसा केला याची माहितीही त्याने पोलिसांना दिली. 

मांढरदेवी येथे पोहोचल्यानंतर अमोलसिंग याने आपली गाडी पार्किंगला लावली आणि पत्नीला घेवून तो पायी चालत निघाला. घाट रस्त्याने तो ललिताला घेऊन गेला आणि आजूबाजूला कुणी नाही याची चाहूल घेत त्याने एका क्षणात पत्नीला घाटात दरीत ढकलून दिले.

ललिता दरीत पडली पण काही अंतरावर ती एका झाडाला अडकली. आपला जीव वाचविण्यासाठी ललिता जीवाच्या आकांताने ओरडू लागली.

 इतर कुणी मदतीला आले नाही पण, अमोलसिंग वीस फुट खाली उतरला. तेथे त्याने तिच्याच साडीने तिचा गळा आवळला आणि खून केला. त्यानंतर तो पुन्हा वर आला. आणि तेथून शांतपणे तो आपल्या गावी

Post a Comment

0 Comments